Wednesday, May 8, 2024
Homeराज्यबसवाढीसाठी पत्रकार संघाचे साखळी उपोषण...

बसवाढीसाठी पत्रकार संघाचे साखळी उपोषण…

Share

  • बसवाढीसाठी पत्रकार संघ उपोषणावर
  • अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल
  • रामटेक आगाराला १५ गाड्यांची आवश्यकता

रामटेक – राजू कापसे

एकीकडे शासनाने महिलांना 50 टक्के सवलत तथा 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना मोफत प्रवास अशा विविध योजना काढल्या त्यामुळे महिलांसह वयोवृद्ध नागरिकांमध्ये हर्षोल्लासाचे वातावरण आहे तर दुसरीकडे त्यामानाने विविध आगारांमध्ये एसटीची संख्या न वाढवल्यामुळे एसटीमध्ये चिक्कार गर्दी होऊन प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल बेहाल होत आहे. नेमकी हीच समस्या हेरून रामटेक येथील भारतीय प्रगतिशील पत्रकार संघाने या विरोधात आंदोलन पुकारलेले असून ते आज दिनांक 7 मार्च पासून रामटेक बस स्थानकापुढे साखळी उपोषणावर बसलेले आहेत.

रामटेक च्या एसटी आगारात मागणीपेक्षा बसेच ची संख्या कमी आहे. बसेसची संख्या कमी असल्याने एका बसमध्ये 100 च्या जवळपास प्रवासी कोंबत असल्यामुळे, विद्यार्थी, नोकरवर्ग, व्यापारी वर्गाला भयंकर त्रास होत आहे. त्याचप्रमाणे दुपारची रामटेक लोकल आगगाडी कोरोना पासून बंद केल्यामुळे व ती सिताबर्डी नागपुर पर्यंत जात नसल्याने आगगाडींच्या प्रवाशांचाही भार एस. टी. वर येऊन पडलेला आहे.

शासनाने 50% सवलत महिलांना दिल्याने महिलांची भरपूर संख्या असते. ही सवलत देण्याआधी एसटीची संख्या परिपुर्तता करायला पाहिजे होती. तसे न केल्यामुळे रामटेक च्या आगारात कमी एसटी असल्याने संपूर्ण वेळापत्रक बिघडलेले आहे. ईव्ही बसेस नागपूरच्या इमामबाडाला देण्याऐवजी, रामटेक आगाराची गरज लक्षात घेऊन आधी रामटेकला एसटी पुरवठा करण्यात यावा, अशी प्रवासी मंडळाची मागणी आहे.

भारतीय प्रगतिशील पत्रकार संघ रामटेक यांनी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन एसटी पूर्तता करण्याबाबत चर्चा रामगिरीवर केलेली होती. त्याचप्रमाणे आगार प्रमुख रामटेक, विभागीय वाहतूक नियंत्रक नागपूर, तहसीलदार रामटेक,

पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामटेक यांना निवेदन देऊन, पंधरा दिवसाच्या आत एसटीची पूर्तता न झाल्यास, भारतीय प्रगतिशील पत्रकार संघ, रामटेक रामटेकच्या एसटी आगारात परिसरात साखळी उपोषण व आंदोलन करील याबाबतचे पत्र दिलेले होते. सर्व कार्यालयाची मंजुरी घेऊन आज दि. 7 मार्च ला सकाळी दहा वाजेपासून रामटेकच्या एसटी आगार परिसर, सावरकर यांच्या हॉटेल समोरील भागात साखळी उपोषण व आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे.

सदर आंदोलन निष्पक्ष असून, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला समर्थन दिलेले असल्याची माहिती यावेळी संघाचे अध्यक्ष नत्थु रामेलवार तथा उपाध्यक्ष कार्तिक उराडे यांनी दिली.

प्रहारचे रमेश कारामोरे यांनी उपोषणस्थळी भेट देवून समस्या जाणुन घेतली. यावेळी उपस्थितांमध्ये भारतीय प्रगतिशील पत्रकार संघाचे अध्यक्ष नथूजी रामेलवार, उपाध्यक्ष कार्तिक उराडे, संघाचे सदस्य नंदकिशोर पापडकर, रामानंद अडामे, कवीश्वर खडसे, नाना उराडे, बंटी टक्कामोरे आदी. उपस्थित होते.

मागणीनुसार लवकरच बसेस मिळणार आहेत – व्यवस्थापक उमा तिवारी

आवश्यकतेपेक्षा बसेस ची संख्या कमी असल्याने ही समस्या उद्भवली आहे. मागणीचा प्रस्ताव पाठविलेला असुन लवकरच या आगाराला टप्प्याटप्याने बसेस मिळणार आहेत.

सध्या आगारामध्ये ४८ बसेस उपलब्ध असुन आणखी दहा ते पंधरा बसेस ची आवश्यकता येथे आहे. त्या मिळाल्या की ही समस्या दुर होईल असे रामटेक आगाराच्या व्यवस्थापक उमा तिवारी यांनी माहिती देतांना सांगितले.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: