HomeBreaking NewsLoksabha Election Phase 3 Voting | बंगालमध्ये सर्वाधिक आणि महाराष्ट्रात सर्वात कमी...

Loksabha Election Phase 3 Voting | बंगालमध्ये सर्वाधिक आणि महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान…आतापर्यंतची परिस्थिती जाणून घ्या

Share

Loksabha Election Phase 3 Voting : लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान 7 टप्प्यात होत आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 राज्यांतील 94 जागांवर 1300 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. प्रचंड उष्णतेमुळे काही राज्यांमध्ये मतदानाची वेळ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. राज्यातही ११जागेवर आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.

बसप उमेदवाराच्या निधनामुळे येथील दुसऱ्या टप्प्यातील २६ एप्रिल रोजी होणारे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. आज ज्या जागांवर मतदान होत आहे त्यात गुजरातमध्ये सर्वाधिक 25 जागा आहेत. याशिवाय कर्नाटकच्या 14, महाराष्ट्राच्या 11, उत्तर प्रदेशच्या 10, मध्य प्रदेशच्या 9, छत्तीसगडच्या 7, बिहारच्या 5, आसाम आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी 4 जागांवर मतदान होणार आहे. दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि गोव्यात प्रत्येकी एका जागेवर आज मतदान होत आहे.

दुपारी 3 वाजेपर्यंत 53.60 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. बंगालमध्ये सर्वाधिक 63.11 टक्के तर महाराष्ट्रात सर्वात कमी 42.63 टक्के मतदान झाले. आसाममध्ये 63.08 टक्के, छत्तीसगडमध्ये 58.19 टक्के, बिहारमध्ये 46.69 टक्के, दादर नगर हवेली आणि दमण दीवमध्ये 52.43 टक्के, गुजरातमध्ये 47.03 टक्के, कर्नाटकात 54.20 टक्के, मध्यप्रदेशात 54.09 टक्के, गोमध्ये 61.78 टक्के मतदान झाले आहे.

५ वाजेपर्यंत या राज्यातील मतदान आकडेवारी

राज्य9 वाजेपर्यंत मतदान %11 वाजेपर्यंत मतदान %1 वाजेपर्यंत मतदान %3 वाजेपर्यंत मतदान %5 वाजेपर्यंत मतदान %
आसाम 10.1227.3445.8863.0874.86
बिहार10.4124.4136.6946.6956.01
छत्तीसगढ़13.2429.9046.1458.1966.87
दादरा नगर हवेली10.1324.6939.9452.4365.23
गोवा13.0230.9449.0461.3972.52
गुजरात9.8724.3537.8347.0355.22
कर्नाटक9.4524.4841.5954.2066.05
मध्य प्रदेश14.4330.2144.6754.0962.28
महाराष्ट्र6.6418.1831.5542.6353.40
उत्तर प्रदेश12.9426.1238.1246.7855.13
पश्चिम बंगाल15.8532.8249.2763.1179.93

Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: