Homeराज्यरामटेक | काचुरवाही येथे वादळी वाऱ्याने गोठ्याचे नुकसान…!थोडक्यात बचावले शेतकरी…

रामटेक | काचुरवाही येथे वादळी वाऱ्याने गोठ्याचे नुकसान…!थोडक्यात बचावले शेतकरी…

Share

राजु कापसे
रामटेक

काचुरवाही येथे ३.३० वाजताच्या सुमारास आलेल्या अचानक वादळी वाऱ्याने जनावरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान केल्याची घटना (दि.७ मे) रोजी समोर आली.

माहितीनुसार, दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याचे काचुरवाही परिसरात आगमन झाले.यातच काचुरवाही येथील रहिवासी अशोक पांडुरंग डोकरीमारे वय ५५ वर्ष.यांच्या शेतातील जनावरांचा गोठा वादळी वाऱ्याने उध्वस्त झाले.अचानक आलेल्या या वादळी वाऱ्याने क्षणातच गोठ्यावरील टिनाचे शेड उखळून टाकले.तर विटांनी बांधकाम केलेली भिंत देखील कोसळून पडली. वादळी वाऱ्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका होऊ नये या उद्देशाने अशोक डोकरीमारे यांनी गोठयात असलेल्या जनावरांची सुटका केली.व काही क्षणातच वादळी वाऱ्याने गोठ्याचे नुकसान केले.यामध्ये शेतमालक थोडक्यात बचावले.

घटनेची माहिती कोतवाल कैलास सहारे यांना देण्यात आली.घटनास्थळी जाऊन त्यांनी घटनेचा पंचनामा केला.तर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी उपसरपंच अनिकेत गोल्हर यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे..


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: