Homeविविधवाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रामटेक तालुका अंतर्गत डोंगरताल येथील रहिवासी स्व.श्री.विठ्ठल कोदुजी...

वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रामटेक तालुका अंतर्गत डोंगरताल येथील रहिवासी स्व.श्री.विठ्ठल कोदुजी वरखडे यांच्या घरी माजी मंत्री श्री.राजेंद्रजी मुळक यांची सांत्वना भेट व कुटुंबाला मदतीचा हात.

Share

राजु कापसे
रामटेक

दिनांक 27/04/2024 ला रामटेक तालुका अंतर्गत डोंगरताल येथील रहिवासी स्व.श्री.विठ्ठल कोदुजी वरखडे हे आपल्या शेतात काम करत असताना अचानक वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यु झाला होता आज दिनांक 06/05/2024 सोमवारला मा.श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी त्यांच्या घरी सांत्वना भेट दिली व परिवाराचे सांत्वन केले.
घरातील कर्ता पुरुष गमावल्याने वरखडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला तसेच त्यांच्या मागे असणाऱ्या त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मदत व्हावी म्हणून राजेंद्र मुळक सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून त्यांची पत्नी राणोबाई विठ्ठल वरखेडे यांना शिलाई मशीन देऊन मदतीचा हात देण्यात आला..

यावेळी श्रीमती.शांताताई कुंभरे (जि.प.सदस्य), श्री.रविभाऊ कुंभरे (प.स.सदस्य, रामटेक), सौ.सारिकाताई उईके (सरपंच देवलापार), सौ.सरलाताई खंडाते (सरपंच खानोरा), श्री.कैलास निघोट, श्री.अब्राहम सिद्दिकी, श्री.संदीप इनवाते, श्री.मोईन पठाण, श्री.दिलीप हरडे, सौ.शीलाबाई लक्ष्मण वरखडे, श्री.नितेश सोनवाणे (माजी सरपंच डोंगरताल), सौ.मोनूताई पठाण, श्री. आशिष पडवार, श्री रामदास पडवार, श्री.गेंदलाल नाकोत, श्री.राजेंद्र डोंगरे, श्री.सुभाष वाकडे इत्यादी मान्यवर मंडळी तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: