Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसमर्थ नगर येथे वाचनालय प्रारंभ करून भीमजयंती उत्साहात साजरी...

समर्थ नगर येथे वाचनालय प्रारंभ करून भीमजयंती उत्साहात साजरी…

Share

स्वतः वर्गणी करून
लुबिनी महिला संघाचा पुढाकार

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील समर्थ नगर पातूर यांच्या वतीने लुबूंनी महिला संघ यांच्या पुढारातून डॉ बाबासाहेब आंबेकडर यांची १३२ व्या जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आहे.
सकाळी ७ वाजता शैलेश इंगळे यांच्या प्रगणात प्रथम बुद्ध वंदना,पूजा विधी,करण्यात आली.त्यानंतर महिलांचा भीम गीताचा कार्यक्रम सुद्धा थाटात साजरा झाला आहे.

त्यानंतर सर्व उपासक उपसिका तथा सर्व समर्थ नगर मधील नागरिकांना खीर वाटप करण्यात आली.तसेच महिलांनी स्वतः वर्गणी गोळा करून विद्यार्थ्यांना व ग्रामस्थाना उपयुक्त व प्रबोधनात्मक पुस्तके वाचायला मिळावीत या करिता वाचनालयास प्रारंभ करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपना गवई,सुशीलाताई खंडारे,ज्योतिताई इंगळे,कविता सोनोने,वनमाला हिवराळे,भैरवी सोनोने,कविता अंभोरे,रंजिता तेलगोटे,सुचिता इंगळे, प्रज्ञाताई कंकाळ,दिव्याताई खडसे,वनदानाताई बोरकर,प्रीती उपरास, मिनाक्षी हिवराळे,मयुरी खंडारे,आदी महिलांच्या उपस्थित कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: