Tuesday, May 7, 2024
Homeगुन्हेगारीमोटारसायकल चा जबर अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार...

मोटारसायकल चा जबर अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार…

Share

पातूर – निशांत गवई

पातूर नजीक असलेल्या खानापूर फाट्यावर एका दुचाकीला अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. आस्टूल कडून पातूरला येत असताना पातूरपासून 3 किमी अंतरावर असलेल्या खानापूर फाट्यावर भरधाव वेगाने येत असलेली दुचाकी रस्त्याच्या कडेवरून घसरल्याने दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने सदर दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून अपघात झाला,यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

ही धडक एवढी जबर होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.सदर मृतक दुचाकीस्वार हा लक्ष्मण शामराव देवकर (वय अंदाजे 35) पांगराबंदी येथील असल्याची माहिती मिळाली. यावेळी पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतकास शवविच्छेदनाकरिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: