Saturday, May 11, 2024
Homeगुन्हेगारीनागपूर-जबलपूर महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात...

नागपूर-जबलपूर महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात…

Share

रामटेक – राजू कापसे

नागपूर-जबलपूर महामार्ग क्रमांक 44 वरील खुमारी गावाजवळ सर्व्हिस रोडने जाणाऱ्या अनियंत्रित ट्रेलरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक देऊन अपघात झाल्याची घटना दि.13 डिसेंबर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, NL 01 AG 1988 क्रमांकाचा ट्रेलर पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी शाळेच्या समोरील सर्व्हिस रोडने जवळपास 80 ते 90 च्या वेगाने जबलपूर कडे जात होता. खुमारी जवळ येताच चालकाला ट्रेलर नियंत्रित न झाल्याने रस्त्याच्या कडेला तयार करण्यात आलेल्या दोन्ही रस्ता दुभाजकावरून ट्रेलर विरुद्ध दिशेने टाकले. यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक HR 55 AJ 1026 क्रमांकाच्या ट्रकला मागेहून जोरदार धडक दिली व धडक देऊन तो ट्रेलर विरुद्ध दिशेच्या सर्व्हिस रोडला जाऊन थांबला.

या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झालेला असून त्याचा उजवा पाय तुटला असल्याची माहिती आहे. ट्रेलर चालकाचे नाव नूर अली (वय 32 वर्ष) रा.हसनबाग नागपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. घटनेची माहिती तात्काळ ओरिएंटल टोल प्लाझा येथे देण्यात आली.टोल प्लाझाचे कर्मचारी मनोज ठाकरे, दत्तू महाजन, PRO लोखंडे, मनोज तनोडिया यांनी कोणतीही वेळ न गमावता तात्काळ घटनास्थळ गाठून जेसीबीच्या साहाय्याने चालकास बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले.
चालकाची अवस्था बघून त्याला नागपूर मेडिकल येथे रेफर करण्यात आले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: