Sunday, April 28, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | वासनांध तरूणाने १९ वर्षीय तरूण मित्राला दारू पाजून केला अनैसर्गिक...

अमरावती | वासनांध तरूणाने १९ वर्षीय तरूण मित्राला दारू पाजून केला अनैसर्गिक अत्याचार…अन व्हिडीओही बनविला…

Share

अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर शहराला लागून असलेल्या बाभळी गावातील एक धक्कादायक घटना समोर आलीय, येथील एका २७ वर्षीय वासनांध तरूणाने १९ वर्षीय तरूण मित्राला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परिसरात घडली. तेथे उपस्थित तिसऱ्याने त्या अनैसर्गिक शरीरसंबंधाचे छायाचित्रण केले. विशेष म्हणजे तो व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल देखील करण्यात आला.

त्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत दर्यापूर पोलिसांनी ३ युवका विरुद्ध गुन्हा दाखल केला.एकाने अत्याचाराचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले आणि व्हॉट्सॲपवर शेअर केले. अन् पाहता पाहता शेकडो लोकांकडे तो व्हिडिओ फॉरवर्ड झाला.बलात्काराच्या अनेक घटना होत असताना मित्रानेच मित्रावर केलेल्या अत्याचाराच्या या धक्कादायक घटनेची चर्चा संपुर्ण दर्यापुरात होत आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: