Friday, May 17, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | ५६ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!...

मूर्तिजापूर | ५६ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!…

Share

प्रतिनिधी/मूर्तिजापूर

मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ग्रामसेवक कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहत असलेल्या अल्पभूधारक शेतकरी तसेच उदरनिर्वाहासाठी मजदूरीचेही काम करणाऱ्या ५६ वर्षीय इसमाने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविली.

प्राप्त माहितीनुसार अल्पभूधारक शेतकरी मृतक दिलीप मनोहर गावंडे वय ५६, फिर्यादी अनिकेत दिलीप गावंडे वय २२ राहणार गोरेगाव पुंडलिक महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या परिस्थितीत ग्रामसेवक कॉलनी येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत होते.

सदर घटना दिनांक १४ डिसेंबर २०२२ सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली.सततच्या नापिकीमुळे शेतीवर असलेले क्रॉप लोन भरून शकल्यामुळे चिंताग्रस्त झाल्याने टोक्याची भूमिका घेतली.त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी व दोन अविवाहित मुले आहे. याबाबत शहर पोलीस स्टेशनला १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महल्ले करीत आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: