Wednesday, May 8, 2024
Homeराज्यश्रीरामजी अस्टनकर यांच्या आठवणींना उजाळा व कवितांचे अभिवाचन...

श्रीरामजी अस्टनकर यांच्या आठवणींना उजाळा व कवितांचे अभिवाचन…

Share

कविवर्य श्रीरामजी अस्टनकर यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा संपन्न, वि.सा.संघ,शाखा रामटेक तर्फे आयोजन

रामटेक – राजु कापसे

कविवर्य व वि.सा. संघ शाखा रामटेकचे पूर्वाध्यक्ष स्व. श्रीरामजी अस्टनकर सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबियांतर्फे त्यांच्या आठवणींना उजाळा व त्यांच्या कवितांचे अभिवाचन अशा कौटुंबिक व वाङ्मयीन कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ साहित्य संघ, शाखा रामटेकच्या वतीने समर्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,रामटेक येथे शनिवार, दिनांक १२ऑगस्ट २०२३ ला दुपारी १ वाजता करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि.सा.संघ,शाखा रामटेकचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य व पत्रकार श्री.दीपकजी गिरधर हे होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्रीरामजी अस्टनकर यांचे चिरंजीव श्री.विरेश श्रीराम आष्टनकर, डॉ.पंकज श्रीराम आष्टनकर तसेच कन्या सौ.शरयु अभय काळबांडे व सौ.प्रिया सुनील गुप्ता यांनी ‘आम्ही अनुभवलेले बाबा’ या विषयावर आपले विचार मांडले.

अस्टनकर सरांच्या मुला-मुलींनी ‘संस्कारक्षम, वक्तशीर, संवेदनशील, प्रामाणिक, कुस्तीपटू, उत्तम शिक्षक,आदर्श वडील,चारित्र्यसंपन्न पती, समाजोपयोगी राजकारणी,उदार सहकारी,खंबीर व कणखर नेतृत्व,कर्तृत्ववान,एक कवी,एक जिवलग मित्र,प्रेरणास्त्रोत, पत्नीवर आयुष्यभर अतिशय प्रेम करणारा एक चिरतरुण प्रियकर,कलयुगातील राम,

एक नॉलेज बँक,उत्तम बासरीवादक,कुशल संघटक व प्रशासक,क्षमाशील,सहिष्णू, गुणग्राहक,सहकार क्षेत्राला विकसित करण्याचा ध्यास घेतलेले व विकासाचा व्हिजन असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व’ अशाप्रकारच्या श्रीरामजी अस्टनकर यांच्या विविध स्वभावविशेषांवर विविध घटना ,प्रसंग,आठवणी व अनुभवांच्या माध्यमातून प्रदीर्घ प्रकाश टाकला.

यावेळी अस्टनकर सरांचे जावई श्री.अभय काळबांडे,श्री.सुनील गुप्ता,सुन सौ.विनिता विरेश आष्टनकर,डॉ.सौ.शिल्पा पंकज आष्टनकर,नात महती,नातू यश आष्टनकर,अनिरुद्ध काळबांडे,नातसून स्नेहा काळबांडे ,मित्र श्री.अनिल(मिन्नूजी) गुप्ता,तसेच समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.शंखपाल लांजेवार,यांचीसुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती होती.

कार्यक्रमाला अस्टनकर सरांचे शिष्य,काँग्रेस नेते व पर्यटक मित्रश्री.चंद्रपालजी चौकसे यांनी आकस्मिक भेट देऊन अस्टनकर सरांप्रती आपली शब्दसुमनांजली वाहताना आपल्याला अस्टनकर सरांकडून खूप काही विधायक गोष्टी शिकता आल्याचे भावोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मराठी साहित्यातील प्रसिद्ध निसर्गकवी,रानकवी ना.धों.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ‘गेला कोरडा पावसाळा, रान झाले वैराण,भिजविले शेत माझे,माझ्याच आसवांनी’ तसेच ‘माझे अंतरीचे बोल,ऐकावे जगानी,प्रेम जगावर,सदा केले मी’

या अस्टनकर सरांच्या प्रसिद्ध काव्यओळींसह त्यांच्या ‘आक्रोश’,’अनुरक्त’,’अबोल डोळ्यांतील संवेदना, ‘उष:काल’, या मराठी तसेच ‘यथार्थ’ या हिंदी कवितासंग्रहांतील अनेक कवितांचे अभिवाचन कविवर्य श्री.नामदेव राठोड,श्री.सुभाष चव्हाण,वि.सा.संघ शाखा रामटेक कार्यकरणी सदस्य अनिल वाघमारे,प्रा.मिनाज पौचातोड,राजेंद्र बावनकुळे,सौ.उमा काठीकर, शाखा अध्यक्ष श्री.दीपक गिरधर,शाखा सचिव डॉ.पवन कामडी तसेच आनंद बारोकर,

डॉ.गजेंद्र बरबटे इत्यादींनी अतिशय तरल पद्धतीने करून अस्टनकर सरांच्या काव्यवैशिष्ट्यांचा आढावा घेतला व त्यांच्या आठवणी जिवंत केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व वि.सा.संघ,शाखा रामटेकचे अध्यक्ष श्री.दीपकजी गिरधर यांनी अस्टनकर सरांच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकून त्यांच्यासोबत असलेल्या ऋणानुबंधास आठवणरुपी उजाळा दिला.

कार्यक्रमाला याप्रसंगी वि.सा.संघ,शाखा रामटेक कार्यकारणी सदस्य श्री.राजेश किंमतकर,पत्रकार नत्थुजी घरजाळे,पत्रकार अविनाश शेंडे, कवी प्रशांत बावनकुळे,सारंग पंडे,डॉ.सौ.बरबटे,सचिन सोमकुवर,मोहन कोठेकर,रामू गासमवार,अखिल धमगाये तसेच विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी,सदस्य,रसिक-श्रोते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वि.सा.शाखा रामटेकचे कार्यक्रम प्रमुख प्रा.डॉ.जगदीश गुजरकर यांनी केले.सूत्रसंचालन शाखेचे सचिव डॉ.पवन कामडी यांनी केले तर आभार शाखा सदस्य प्रा.संतोष ठकरेले यांनी मानले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: