Monday, February 26, 2024
Homeसामाजिकमाजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी यांची अमरावतीच्या जिल्हा नियोजन समितीत निवड…

माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी यांची अमरावतीच्या जिल्हा नियोजन समितीत निवड…

Share

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले मूर्तिजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी यांची अमरावती जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये निवड झाल्याने अमरावती शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. नानकराम नेभनानी यांनी दोन वर्षापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांचे आणि एकनाथ शिंदे यांचे जिव्हाळ्याचे संबध असल्याने त्यांची या पदावर निवड झाल्याचे समजते.

मूर्तिजापूर शहरात समाजसेवे बरोबर राजकारणातही एक वेगळा ठसा उमटविल्या नंतर त्यांनी तोच वसा अमरावतीत शहरात सुरु ठेवला, त्यांनी दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याच पद तसेच मूर्तिजापूर नगरपालिकेचे २५ वर्षे सदस्य असण्याबरोबरच ते पाच वर्षे मूर्तिजापूर नगरपालिकेचे बिनविरोध अध्यक्ष होते.

त्यांनी यशस्वी राजकीय खेळी खेळताना त्यांनी आपल्या भाषा आणि संवाद कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या प्रवृत्तीने राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले. तसेच, आता त्यांच्याकडे अमरावतीच्या नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदाची जबाबदारी सोपविल्याने ते चांगल्या प्रकारे पार पडतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: