Thursday, June 1, 2023
Homeराज्यमान्सून कालावधीत दामिनी ॲपचा वापर करा...जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

मान्सून कालावधीत दामिनी ॲपचा वापर करा…जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

महेंद्र गायकवाड
नांदेड

मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवीत हानी होते. ही जीवीतहानी होवू नये यासाठी नागरिकांनी व विशेषत: शेतकऱ्यांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी ॲप अवश्य वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.

भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने हे दामिनी ॲप तयार केले असून हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, अधिकारी-कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी / मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, गाव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा ईन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे.

या ॲपचे जीपीएस लोकोशनचे काम करीत असून वीज पडण्याचा 15 मिनीटापूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये आपले सभोवतालच्या वीज पडत असल्यास ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे. तसेच त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. गावातील सर्व नागरिक, शेतकरी यांनी दामिनी ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. दामिनी ॲपमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्लटनुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देवून, होणारी जीवीत व वित्तहानी टाळावी, असेही आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: