Saturday, April 20, 2024
Homeराजकीयनांदेड जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतीच्या 47 जागेसाठी उद्या मतदान...मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक...

नांदेड जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतीच्या 47 जागेसाठी उद्या मतदान…मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश…

Share

महेंद्र गायकवाड
नांदेड

नांदेड जिल्‍ह्यातील (निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्‍य/थेट सरपंचाच्‍या रिक्‍त झालेल्‍या पदांकरीता) ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2023 करिता मतदानाच्‍या दिवशी मतदान केंद्र परिसरात गुरूवार 18 मे 2023 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून मतदान संपेपर्यन्‍त व मतमोजणीच्‍या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात शुक्रवार 19 मे 2023 रोजी मतमोजणी सुरु झाल्‍यापासून मतमोजणी संपेपर्यन्‍त प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी लागू केले आहेत.

महाराष्ट्र राज्‍य निवडणूक आयोगाने निवडणूक निर्दिष्‍ट कार्यक्रमानूसार नांदेड जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतीच्या एकुण 47 जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून ही निवडणूक प्रक्रिया चालू आहे. या निवडणुकीचे मतदान गुरूवार 18 मे 2023 रोजी तर मतदानाची मतमोजणी शुक्रवार 19 मे 2023 रोजी निश्चित केलेल्‍या स्‍थळी होणार आहे.

नांदेड जिल्‍ह्यात निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्‍य/थेट सरपंचाच्‍या रिक्‍त झालेल्‍या पदांकरीता ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2023 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय्य वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्टीकोणातून कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहण्‍यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये गुरूवार 18 मे 2023 रोजी ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे त्‍या ठिकाणापासून तसेच शुक्रवार 19 मे 2023 रोजी ज्‍या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंध केले आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: