Tuesday, May 7, 2024
Homeराज्यमाजी मंत्री स्व. डॉ.पतंगराव कदम यांचे शासकीय रुग्णालय चौकास नाव :- नामफलकाचे...

माजी मंत्री स्व. डॉ.पतंगराव कदम यांचे शासकीय रुग्णालय चौकास नाव :- नामफलकाचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते अनावरण…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोरील चौकास माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचे नाव देण्यात आले आहे. सदर नामफलकाचा अनावरण सोहळा, आज शासकीय रुग्णालयाच्या चौकात मोठ्या दिमाखात पार पडला.

सदर नामफलकाचे अनावरण राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार संजय काका पाटील, माजी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार विक्रम सिंह सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, रावसाहेब पाटील, आदींसह काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपात येण्याची गरज असून सुरुवातीला तुम्ही दोघे आत आला तर इतरही तुमच्या मागे येतील अशा तऱ्हेची खुलेआम ऑफर व्यासपीठावरून दिली आहे.

यामुळे काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यां मध्ये चर्चेला उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार की काय? याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: