Saturday, April 27, 2024
Homeगुन्हेगारीमोटर सायकल चोरास विश्रामबाग पोलिसांकडून अटक...

मोटर सायकल चोरास विश्रामबाग पोलिसांकडून अटक…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील बापट मळा,निशांत कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरी केलेली मोटरसायकल ढकलून घेऊन जात असताना,खास बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून मोटरसायकल चोर राजू बादशहा मुल्ला. वय- ४४ राहणार-शांतीसागर कॉलनी, दक्षिण शिवाजी नगर सांगली.यास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 20हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची गाडी जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधीकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी,

सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे,पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास मुंडे, पोलीस नाईक दरीबा बंडगर, पोलीस नाईक संदीप साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप घस्ते, पोलीस कॉन्स्टेबल महंमद मुलाणी, महिला पोलीस कॉन्स्टेबल भावना यादव यांनी केली.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: