Tuesday, May 7, 2024
Homeगुन्हेगारीDRDO चे प्रदीप कुरुलकर कोणाच्या संपर्कात होते?...धक्कादायक माहिती आली समोर...

DRDO चे प्रदीप कुरुलकर कोणाच्या संपर्कात होते?…धक्कादायक माहिती आली समोर…

Share

न्युज डेस्क – डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (DRDO) शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर सध्या पाकिस्तानला माहिती लीक केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. डॉ.कुरुलकर हे डीआरडीओच्या पुणे केंद्रात कार्यरत होते. DRDO ची देशात इतर अनेक ठिकाणी केंद्रे आहेत.

एटीएस आता कुरुलकर इतर केंद्रांमध्ये कोणाशी संबंधित होते याचा तपास करत आहे. डॉ. कुरुलकर यांना 3 मे रोजी अटक करण्यात आली होती, मात्र 24 फेब्रुवारीपासून डीआरडीओच्या दक्षता पथकाने त्यांच्याविरुद्ध तपास सुरू केल्याचे आता समोर आले आहे. त्याच दिवशी त्याच्याकडून दक्षता पथकाने दोन मोबाईल, एक लॅपटॉप आणि एक डेस्कटॉप जप्त केला.

त्यांना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. तेथून अहवाल आल्यानंतर ते सर्व पुरावे महाराष्ट्र एटीएस प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आले. यानंतर एटीएसमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. कुरुलकर यांनी व्हॉट्सएप कॉल, व्हॉईस मेसेज आणि व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानी गुप्तहेरांशी संवाद साधल्याचा आरोप आहे. एवढच नाहीतर पाकिस्तानच्या हेरांशी परदेशात जाऊन भेट घेतल्याची धक्कादायक माहिती ATSच्या चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे.

यादरम्यान त्याने काही महत्त्वाची कागदपत्रे लीक केली, ज्यामुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. कुरुलकर यांच्यावर फक्त हनी ट्रॅप झाला होता की? त्यांनी शेअर केलेल्या माहितीतून त्यांना काही आर्थिक फायदा झाला होता का?…त्यांनी अनेक परदेश दौरे केले. त्यावेळी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे लोक त्यांना भेटले का?…याचा तपास सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला हनी ट्रॅपिंग केल्यानंतर, त्याला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेकडून धमकी देण्यात आली होती की, त्याचा संपूर्ण संवाद भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल.

यामुळे कुरुलकर घाबरले आणि त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशी विशिष्ट माहिती शेअर करण्यास सुरुवात केली. कुरुळकर यांच्याशी पहिली व्हॉट्सएप चॅट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती. सुमारे चार दशकांच्या DRDO मधील कारकिर्दीत कुरुलकर यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: