Sunday, April 28, 2024
Homeराज्यपातुर तलावाचे नदीपात्रात पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी...

पातुर तलावाचे नदीपात्रात पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी…

Share

पातुर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील पर्यटन स्थळाच्या बाजूला असलेल्या पातुर तलाव हा यावर्षी शंभर टक्के पाण्याने भरलेला आहे व गव्हाचा हंगाम होउन खूप दिवस झाले या परिस्थितीत परिसरातील चिंचखेड बोडखा पातुर बोर्डी नदी ही संपूर्ण कोरडी असल्याने या भागातील विहिरीची पाण्याची पातळी उष्णतेमुळे खूप खोल गेली आहे.

या परिसरामधील गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. नदीपात्र हे कोरडे झाल्याने या परिसरातील जंगल भागातील जंगली प्राणी हे गावाकडे धाव घेत आहेत. बोडखा, चिंचखेड हा परिसर फळबागेचा असून विहिरीची उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी झाल्याने फळबाग वाचण्यास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रयत्न करावा लागत आहे.

या दोन्ही गावांमध्ये पिण्याची पाण्याची टंचाई होत आहे याबाबत नागरिकांनी खासदार संजय भाऊ धोत्रे व बाळापूर विधानसभेचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडे नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी 15 मार्च रोजी केली असता या दोन्ही लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याचे पत्र संबंधित कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना दिल्याचे कळते परंतु अद्याप पर्यंत या पत्राची कोणत्याही प्रकारची या विभागाने दखल घेतली नाही त्यामुळे अद्याप पर्यंत शंभर टक्के भरलेले पातुर तलावाची पाणी सोडण्यात आले नाही.

या परिसरात गुरांना पाणी पाजण्याकरता मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत म्हणून पातुर तलावाचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी चिंचखेड, बोडखा, पातुर, येथील ग्रामस्थांनी केली आहे


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: