Sunday, April 28, 2024
Homeराज्य'बाई पण भारी देवा' एक पात्री प्रयोगाने व परिसंवादाने गाजला ग्रंथोत्सव...

‘बाई पण भारी देवा’ एक पात्री प्रयोगाने व परिसंवादाने गाजला ग्रंथोत्सव…

Share

अकोला – संतोषकुमार गवई

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत दोन दिवसीय ग्रंथोत्सव.साजरा करण्यात आला अकोला ग्रंथालय चळवळीतील ग्रंथ प्रेमींसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी ठरली. ग्रंथोत्सस्वाच्या द्वितीय दिवशी स्पर्धा परीक्षेतील आव्हाने या कार्यक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याकरिता आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नितीन शेगोकार यांनी मार्गदर्शन केले.

करिअर केअर अकॅडमी तर्फे अनिल हांडे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन ज्योती सरदार यांनी केले द्वितीय सत्रात अकोट येथील कुमारी हर्षदा इंदाने या मुलींनी ‘बाई पण भारी देवा ‘हा बहारदार एक पात्री प्रयोग सादर करून व स्त्री पात्राची विविध रूपे सादर करून हास्य फुलविले तृतीय सत्रात वाचन संस्कृतीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयाचे योगदान व भूमिका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या चर्चासत्राचे अध्यक्षस्थानी रामभाऊ मुळे होते या चर्चासत्रात ग्रंथ मित्र राजेश डांगटे, भास्करराव पिलात्रे, यांनी सहभाग घेऊन जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे वाचन संस्कृती करिता असणाऱ्या भूमिका व नाविन्यपूर्ण उपक्रमावर चर्चा केली श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात आला.

ग्रंथोत्सवाच्या यशस्वी बाबत जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे, कैलास गव्हाळे ,रवींद्र इखार, राजेश देवकर मिश्रा यांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी जिल्ह्यातील लोक चळवळ समृद्ध करण्याकरिता ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून हा आदर्श घ्यावा व चळवळ गतिमान व गुणात्मक करावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाला वर्हाडी साहित्यिका प्रतिमा इंगोले यांची उपस्थिती होती सर्वांचे आभार कैलास गव्हाळे यांनी मानले ग्रंथोत्सवाला जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचे पदाधिकारी ,वाचक ,प्रकाशक लेखक यांची उपस्थिती लक्षणीय होती. विविध प्रकाशकांनी लावलेल्या स्टाल वर ग्रंथप्रेमींनी एकच गर्दी केली होती.प्रचंड प्रतिसादामुळे डिजिटल युगामध्ये पुस्तकांचं महत्व अबाधित आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: