Wednesday, May 1, 2024
Homeराज्यनागपुरातील बेरोजगारी हे भाजपची देण - खा. सुप्रिया सुळे...

नागपुरातील बेरोजगारी हे भाजपची देण – खा. सुप्रिया सुळे…

Share

हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ता पदाधिकारी यांच्याशी सुप्रिया सुळे यांचा संवाद…

नागपूर – शरद नागदेवे

हिगंणा – नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात तरुणांच्या हाताला रोजगार नाही औद्योगिक क्षेत्र ओसाड पडत चालली पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा ही भाजपची देण असल्याची घनाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी हिंगणा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केली.

पुढे बोलताना सुळे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांच्याशी आपापसात मतभेद न ठेवता सर्वांनी मिळून भाजप हाच आपला मुख्य शत्रू समजून वैचारिक लढाई जोमाने लढली पाहिजे व येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार निवडून येईल असे प्रयत्न करायला पाहिजे अशा म्हणाल्या. तर यावेळी माजी रमेशचंद्र मंत्री बंग यांनी नागपुरात भाजप सरकारचे मोठे मंत्री असून सुद्धा नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची मोठी दुर्दशा असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, अल्पसंख्याक सेलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, माजी आमदार विजय घोडमारे (पाटील) माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते दिनेश बंग, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टाकसांडे , जिल्हाध्यक्ष राजू राऊत, शहराध्यक्ष दुनेश्वर, पेठे, नागपूर जिल्हा ग्रामीण निरीक्षक अतुल वांदिले आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी करिता हिंगणा तालुकाध्यक्ष योगेश सातपुते, नागपूर ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रवीण कुंटे, जिल्हा परिषद सदस्य उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य वृंदा नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य रश्मी कोटगुले, युवक जिल्हाध्यक्ष आशिष पुंड, सामाजिक न्याय विभाग सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, वाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, श्याम मंडपे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे, प.स सभापती सुषमा कावळे, उपसभापती उमेशसिंग राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष लीलाधर दाभे, बजरंगसिंग परिहार ,

दिलीप पनकुले, मंगेश सबाने, नगरसेवक गुणवंता चामाटे, दादाराव इटनकर, प्रवीण घोडे, मेघा भगत, विशाखा लोणारे, मुकेश ढोमणे, रोशन खाडे, सुरेंद्र मोरे, दिनेश उईके, वसंत ईखणकर, श्यामबाबू गोमासे, अशोक लोकरे, रामकिशोर महल्ले, प्रेमलाल चौधरी, सुधाकर धामंदे,सुनील बोंदाडे, शारदा शिंगारे, सुहास कोहाड, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: