HomeSocial Trendingअकोल्याच्या लेकीन सातासमुद्रापार केलं नाव लौकिक…

अकोल्याच्या लेकीन सातासमुद्रापार केलं नाव लौकिक…

Share

अकोला : अकोल्याच्या लेकीन जागतिक स्तरावर सौंदर्य स्पर्धेत मोठा मान असलेल्या ‘द ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये मराठी मोहोर उमटलीये. मुळची अकोल्याची मात्र आता अमेरिकन नागरिक असलेल्या गार्गी खोडे या सौंदर्यवतीने ‘मोस्ट फोटोजेनिक फेस गटा’त विजेतेपद पटकावलंय.

अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातल्या स्नोकॉलीमी शहरात रविवारी ही स्पर्धा पार पडलीय. अंतिम फेरीतील एकुण 11 सौंदर्यवतींमधून तिची निवड झालीये. तिचे वडील रविंद्र खोडे हे व्यवसायानिमित्ताने अमेरिकेत स्थायिक झालेयेत. याआधी तिने ‘मीस रेडमंड टीन वॉशिंग्टन स्टेट’, मीस टीन ग्लोबल एशिया इंडिया असे किताब पटकावलेयेत. तिच्य् या यशाबद्दल अकोलेकरांनीही आनंद व्यक्त केलाय.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: