Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराज्यपातूर | विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू…

पातूर | विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू…

पातूर = निशांत गवई

कपडे वाळत टाकण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना २० मे राेजी सकाळी ११ वाजता घडली. देवकी उर्फ साेनाली प्रशांत निमकंडे (वय २६, रा. गुजरी लाईन्स, पातूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
साेनाली निमकंडे या २० मे राेजी टेरेसवर कपडे वाळत टाकण्यासाठी गेल्या.

विद्युत वािहनीचा करंट टिनामध्ये गेला. यातूनच त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्या काेसळल्या. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक डाॅक्टरांकडे भरती केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात पाठविण्यात आला.

याप्रकरणी अजिंक्य प्रकाश निमकंडे यांनी पातूर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. दुर्घटनेची माहिती मिळताच ठाणेदार किशाेर शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी व पंचनामा केला. सध्या तक्रारीवरून पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: