Tuesday, May 7, 2024
Homeगुन्हेगारीदुकानातून रोख रक्कम चोरणाऱ्या दोघांना कडेगाव एसटी स्टँड परिसरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण...

दुकानातून रोख रक्कम चोरणाऱ्या दोघांना कडेगाव एसटी स्टँड परिसरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली अटक…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सांगली जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्या तील आरोपींचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी दिला.त्यानुसार विटा परिसरात पेट्रोलिंग करत असताना खास बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दुकानातून रोख रक्कम चोरणाऱ्या रोहित बाजीराव आकळे वय- 32,राहणार- केदारवाडी, तालुका- वाळवा.आणि बाबूलाल सुलतान मिना वय-33,मूळ राहणार -धीरजपुर, राजस्थान. सध्या राहणार -चिंचणी, वांगी, तालुका -कडेगाव या दोघांना कडेगाव,

एसटी स्टँड परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेच्या अंमलदारानी ताब्यात घेतले.त्यांची अंगझडती घेतली असता रोहित आकळे याच्याजवळ पॅन्टच्या खिशात रोख सात हजार रुपये मिळून आले, सदर पैशांविषयी विचारणा केली असता, कडेगाव ते सोनहिरा कारखाना रोडवरील शिव ट्रेडर्स या दुकानात चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याजवळून रोख सात हजार आणि गुन्ह्यात वापरलेले फॅशन प्लस ही

40 हजारांची मोटर सायकल असा एकूण47 हजारचा मुद्देमाल जप्त केला.आरोपींसह मुद्देमाल पुढील तपास कामी कडेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार मारुती साळुंखे, सुधीर गोरे,सचिन कनप,आदींनी केली.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: