Tuesday, May 7, 2024
Homeगुन्हेगारीविट्यातील जिओ मार्ट ऑनलाइन ग्रोसरी डिलिव्हरी सेंटर फोडून चोरी करणाऱ्या दोघांना अटक...

विट्यातील जिओ मार्ट ऑनलाइन ग्रोसरी डिलिव्हरी सेंटर फोडून चोरी करणाऱ्या दोघांना अटक…

Share

सांगली – ज्योती मोरे

विट्यातील जीवामाच्या ऑनलाईन ग्रोसरीची डिलिव्हरी करणाऱ्या सेंटरचे कुलूप तोडून आतील 9 लाख 43 हजारांची रोख रक्कम असणारी तिजोरी उचलून नेल्याची धक्कादायक घटना 9 ऑक्टोबर 2022 रोजी घडली होती. याबाबत सुपरवायझर सर्फराज युसुफ शिकलगार यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

दरम्यान खास बातमीदाराने दिलेल्या बातमीच्या आधारे संशयीत कामगार मनीष देवदास झेंडे यांच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा उघडकीस आला मनीष देवदास झेंडे वय 21 वर्षे धंदा शेती मुळगाव बलवडी तालुका खानापूर सध्या राहणार नेवरी, तालुका कडेगाव याने आपला साथीदार पवन मधुकर झेंडे व 21 धंदा शेती राहणार बलवडी, तालुका खानापूर याच्या साथीने सदर चोरी केल्याचे कबूल केले आहे.

आरोपींकडून चोरीस गेलेला माल,गोदरेज कंपनीची तिजोरी रोख रक्कम 7 लाख 80 हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 8 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची सात लाख 80 हजारांची रोख रक्कम फिर्यादी सरफराज शिकलगार यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली.

अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले,उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम ,पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक पि.के. कनेरे, पोलीस नाईक हनुमंत लोहार, पोलीस नाईक अमरसिंह सूर्यवंशी, पोलीस नाईक राजेंद्र भिंगारदेवे, पोलीस नाईक नवनाथ देवकते, पोलीस नाईक शशिकांत माळी ,पोलीस नाईक सुरेश भोसले, अभिजीत वाघमोडे ,पुंडलिक कुंभार, सुजित देवराय, सागर निकम, रोहित पाटील ,अक्षय जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख आदींनी केली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: