Thursday, April 25, 2024
Homeराज्यस्वामी विवेकानंद विद्यालय देवलापारने इतिहास रचला...

स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापारने इतिहास रचला…

Share

रामटेक – राजु कापसे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आयोजित 51 वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन 2023- 24 मध्ये नागपूर जिल्ह्य़ातील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त करून नवीन इतिहास रचला.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयातील तीन प्रतिकृतीसह राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून विविध गटामधील 400 च्या जवळपास विज्ञान प्रतिकृती सहित विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधील दिव्यांग प्राथमिक गटात नागपूर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील उल्हास वामनराव इटानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंश विलास मरसकोल्हे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या

‘वंश का हात सबके साथ’ या प्रतिकृतीला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाले तर आदिवासी गटामधील प्राथमिक गटात याच विद्यालयातील केतन घनश्याम कामडी यांच्या मार्गद्शनाखाली आसावरी अशोक आस्वले या विद्यार्थिनीच्या मॉडर्न लाईफस्टाइल फॉर एन्व्हायरमेंट या प्रतिकृतीला सुद्धा प्रथम क्रमांक प्राप्त झाले आहे. विद्यालयातील विद्यार्थिनी नेहरिका ठाकूरपेलने या विद्यार्थिनीने सुद्धा फ्री एनर्जी टाईल प्रतिकृती सह प्रदर्शनात सहभाग घेतला होता. तिचे मार्गदर्शक शिक्षक सुनिल वेलेकर होते.

आज पर्यंतच्या इतिहासामध्ये राज्य विज्ञान प्रदर्शनात एकाच विद्यालयातील दोन विविध गटातील प्रतिकृतींना प्रथम क्रमांक प्राप्त झालेले नाही. परंतु या वर्षी स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार या विद्यालयाने राज्य विज्ञान प्रदर्शनात दोन प्रतिकृतींना प्रथम स्थान मिळवत पहिल्यांदा हा मान प्राप्त केला.

विशेष म्हणजे वंश मरसकोल्हे च्या प्रतिकृतीच्या दालनाला महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी भेट देऊन वंशचे कौतुक केले.
विजेत्या दोन्ही विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. जयंतराव जी मुलमुले, कार्यवाह मा. अरविंद जी जोशी, प्राचार्य जगन्नाथ गराट, पर्यवेक्षक जयंत देशपांडे, सर्व शिक्षक बंधू भगिनी व परिसरातील पालकवर्गानी प्रशंसा केली व राष्ट्रीय स्तरावरही सहभागी होऊन यश संपादन करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: