Thursday, May 2, 2024
Homeराज्यपोलीस स्टेशन ला पोहोचले एज्युविला पब्लिक स्कूल चे विद्यार्थी, चला व्यवस्था समजून...

पोलीस स्टेशन ला पोहोचले एज्युविला पब्लिक स्कूल चे विद्यार्थी, चला व्यवस्था समजून घेऊ या अभियानाला सुरुवात…

Share

एसपी इंस्पेक्शन नंतर विद्यार्थी जागरूकता अभियान

पातुर – निशांत गवई

पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावहारिक शिक्षण महत्वाचे आहे हा धागा पकडून एज्युवीला पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापिका विद्या निलेश गाडगे यांच्या संकल्पनेतून चला व्यवस्था समजून घेऊ अभियानाची सुरुवात पातूर पोलीस स्टेशन पासून झाली.
पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावहारिक शिक्षण फार महत्वाचे आहे पोलीस विभागाची रचना कशी आहे?

पोलिस विभाग काम कसे करतो, पोलिसांची कार्यपद्धती कशी,पोलीस दलात किती व कोणत्या शाखा काम करतात,कमी मनुष्यबळात पोलीस कसे काम करतात ,पोलिसांच्या मदतीला कोण असत,पोलिसांची भीती कोणाला वाटावी,अश्या एक नव्हे अनेक प्रश्नांचे निरासरण पातूर पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर शेळके व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक गजनान पोटे, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन पाचपोर,

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद पवार,पोलीस हवालदार हिम्मत डिगोळे, शरद साबे, पोलीस अंमलदार अभिजित असोलकर,गोकुळा सोळंके महिला गृहरक्षक सुनिता इंगळे यांनी पी एस ओ कामकाज गोपनीय विभाग, स्टेशन डायरी,क्राईम विभाग, गुन्हे अन्वेषण ,लॉक उप, मालखाना ,शस्त्र विभाग ,वायरलेस विभाग,

या सर्व शाखांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. चला व्यवस्था समजून घेऊ अभियान यशस्वी करीता एज्युविला पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापिका विद्या निलेश गाडगे शिक्षिका सोनू वाणी,प्रतिभा अंधारे,सुषमा इनामदार,अनुराधा कराळे यांनी परिश्रम घेतले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: