Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजन"शिवनेरी सेवा मंडळ" यांच्या वतीने विविध कार्यक्रमांनी शिवनेरी कट्टा साजरा करण्यात आला...

“शिवनेरी सेवा मंडळ” यांच्या वतीने विविध कार्यक्रमांनी शिवनेरी कट्टा साजरा करण्यात आला…

Share

मुंबई – गणेश तळेकर

दादर मधील “शिवनेरी सेवा मंडळ” यांच्या वतीने 12 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6 वा. भवानी माता क्रीडांगण शिंदेवाडी येथे मुंबईतील कलाकारांच्या विविध कार्यक्रमांनी शिवनेरी कट्टा साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. श्री. चंद्रशेखर पुसाळकर सर. (भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातु) आणि विश्वस्थ दादासाहेब फाळके मेमोरियल फाऊंडेशन सोबत त्यांच्या पत्नी सौ. मृदुला चंद्रशेखर पुसाळकर (भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांची नातसुन) आणि विश्वस्थ दादासाहेब फाळके मेमोरियल फाऊंडेशन.

त्याच प्रमाणे शिवनेरी कट्टा या कार्यक्रमाच्या उदघाटनाला मा. श्री. मोहन पवार साहेब, (अभियंता, समाज सेवक, लेखक, अभिनेते, निर्माते (मनोरंजन वादयवृंद-मुंबई), त्यांच्या सोबत श्री व सौ. मोहन पवार परिवार उपस्थित होता. तसेच विशेष अतिथी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, पत्रकार, समाजसेवक मा. श्री. गणेश तळेकर उपस्थित होते. श्री. चंद्रशेखर पुसाळकर (भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातु ) मेमोरियल फाऊंडेशन. यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.

उदघाटक मा. श्री. मोहन पवार साहेब आणि सर्व मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या वेळी मंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि शिवसेना शाखा प्रमुख श्री. नितिन पेडणेकर, उपाध्यक्ष देविदास कदम, सचिन मांजरेकर ,विलास पेडणेकर, कार्यवाह किरण मोरजकर, प्रकाश भोसले. सांस्कृतिक विभाग प्रमुख अभिनेते श्री. जनार्दन सोनवडेकर, संजय माजरेकर, अविनाश म्हसकर, सुहास पाटकर सुत्रसंचालक सुनील कांबळी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मा. श्री. चंद्रशेखर पुसाळकर सर. (भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब यांचे नातु ) यांनी सुंदर माऊथ ऑर्गन वाजवून केली. आणि त्यांनी रसिक प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या गजरात दाद मिळवली. दादरच्या या नामांकित शिवनेरी सेवा मंडळाच्या * शिवनेरी कट्टा* या कार्यक्रमात 5 वर्ष वयोगटा पासुन 82 वर्ष वयोगटातील मुंबई मधील विविध विभागातून पनवेल – विरार पासुन कलाकार सहभागी झाले होते… या कार्यक्रमात एका पेक्षा एक कलाकारांनी विविध वेषात एकपात्री अभिनय, गायन (कराओके), नृत्य, वादय वादन, वक्तृत्व अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम सादर करून रसिक प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या जल्लोषात दाद मिळवली.

या कार्यक्रमाचे विजेते
1)सटँडअप कॉमेडी : आकाश मुळीक, (प्रथम क्रमांक), राहूल पेडणेकर (द्वितीय क्रमांक),
2) नृत्य (डान्स) मोठा गट :: स्नेहा संकुडे (प्रथम क्रमांक), श्री. महेश कोल्हे (द्वितीय क्रमांक),
लहान गट : सावरी प्रशांत मढव, (प्रथम क्रमांक), गितांजली मुर्गन (द्वितीय क्रमांक),
3) गायन (कराओके स्पर्धेत) मोठा गट : सिमा पाटील (प्रथम क्रमांक), श्री. विकास चव्हाण (द्वितीय क्रमांक),
लहान गट : स्मिथ संभाजी बुवा, (प्रथम क्रमांक), ईश्वरी लोहोटे. (द्वितीय क्रमांक),
4) वकृत्व स्पर्धा : विघ्नेश सुनील घाडीगांवकर, (प्रथम क्रमांक), आरव लाढे (द्वितीय क्रमांक),
5) वादय वादन : आदित्य दधम,
आरूष जाधव,
या कार्यक्रमासाठी परिक्षक : 1) श्री. समीर तडवी, 2) प्रज्ञा संजीव बोरकर, 3) अमृता प्रशांत पारकर
यांनी सर्व स्पर्धांचे परिक्षण करून योग्य निकाल दिला.
या कार्यक्रमात विजते स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मान चिन्ह, आणि प्रमाण पत्र देण्यात आले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारां सुद्धा सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन सन्मानित केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य याचे सहकार्य लाभले. त्याच प्रमाणे श्री. विलास
पेडणेकर, किरण मोरजकर, निलेश शिरोडकर, देविदास कदम, अशोक सावंत आणि प्रमुख कार्यवाह नितिन पेडणेकर
यांच्या वेळोवेळी सहकार्य लाभले. मंडळाचे उपाध्यक्ष सचिन मांजरेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख जनार्दन सोनवडेकर
यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मुक्ताई नृत्याविषकारचे संचालक : विनोद मोहिते, कराओकै सिंगर : अनन्या विपिन शिवलकर तसेच
कवी विजय कांबळे अशा अनेक कलाकारांनी आम्हाला सहकार्य केल्या बद्दल यांचे मंडळ आभारी.
सुनील कांबळी यांनी आपल्या दिलखुलास निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि प्रमुख पाहुणे मा. श्री. चंद्रशेखर
पुसाळकर सर.(भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब यांचे नातु ) यांनी कभी अलविदा ना कहना
हे गाणे सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: