Homeराज्यरामटेक बाजार समितीत धानाची विक्रमी आवक, दीड लक्ष क्विंटल धानाची विक्री...

रामटेक बाजार समितीत धानाची विक्रमी आवक, दीड लक्ष क्विंटल धानाची विक्री…

Share

वाढीव भाव मिळाल्याने शेतकरी सुखावला, समीतीच्या सेसमध्येही मोठी वाढ…

रामटेक – राजु कापसे

रामटेक हा तालुका धान उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो.येथील शेतकऱ्याकडे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर धानाची लागवड केली जाते.यावर्षी रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवार शितलवाडी येथे धानाची विक्रमी आवक झाली एवढेच नव्हे तर यावर्षी धानाला चांगला भाव मिळाल्याने धान उत्पादक शेतकरी सुखावला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे दीड लक्ष क्विंटल धानाची विक्रमी आवक बाजार समितीत झाल्याची अधिकृत माहिती बाजार समितीच्या अधिकृत सुत्रांनी दिली.

धानाला यावर्षी ४४००-४८०० रुपये प्रति खंडी (१५० किलो) भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.गेल्या एप्रिल २०२३ मध्ये येथे दिर्घ प्रशासकीय कालावधीनंतर निवडणुकीच्या माध्यमातून निर्वाचित संचालक मंडळ येथे पदारूढ झाले. सभापती सचिन किरपान व उपसभापती लक्ष्मी कुमरे यांच्या नेतृत्वात सर्वच संचालक बाजार समितीचे सर्व संचालक बाजार समितीच्या उत्पन्नवाढ व विकासासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

समितीचे प्रवेशद्वार, व्यावसायीक संकुल, गोदाम, कॉंक्रेटीकरण, सुलभ शौचालय, अंतर्गत रस्ते यांसह कोट्यवधी रुपयांची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. धान उत्पादक शेतकरी, बाजार समितीत कार्यरत अडते, व्यापारी व कर्मचारी यांचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे सभापती सचिन किरपान यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी शेती मालाची विक्री बाजार समितीच्या आवारातच करावी.-सभापती. कुठल्याही परिस्थितीत बाजार समितीत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव व वेळेत चुकारे मीळतील त्यामुळे शेतकऱ्यांनी रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शितलवाडी आवारातच त्यांचेकडील शेतमाल आणावा असे आवाहन सभापती सचिन किरपान यांनी  केले आहे.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: