Saturday, April 27, 2024
Homeराज्यमोटारसायकल अपघातात एक ठार एक गंभीर...

मोटारसायकल अपघातात एक ठार एक गंभीर…

Share

विवरा फाट्या नजीक ची घटना…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील बाभूळगाव आलेगाव मार्गावरील विवरा फाट्या जवळ एका मोटारसायकल ने निंबा च्या झाडाला जबरदस्त धडक दिली यात एक जण ठार झाला तर एक जण गंभीर झाल्या चि घटना दिनांक 20 फेब्रुवारी च्या सकाळी 11:30 वाजता च्या दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि पातूर येथील दोन युवक सागर मुकिंदा गुडदे व विजय ताजने हे आपल्या मोटारसायकल क्रमांक MH 30 AQ 7053 ने आलेगाव येथे जात असताना विवरा फाट्यावर मोटारसायकल अनियंत्रित होऊन निंबाच्या झाडाला जबरदस्त धडक दिली.

या अपघातात दोघे हि गंभीर होऊन घटनास्थळ वर पडून होते घटने चि माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळ वर धाव घेतली मात्र योग्य वेळी मदत न मिळाल्यामुळे विजय ताजने याचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला तर सागर गुडदे हा गंभीर असून घटनास्थळ वर पातूर चे ठाणेदार किशोर शेळके, घोंगे मेजर, भारस्कर मेजर यांनी पंचनामा करून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: