Friday, September 22, 2023
Homeराज्यक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल इंडिक टेल्स या वेबसाईटसह...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल इंडिक टेल्स या वेबसाईटसह लेखकावर कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

मोरेक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स या वेबसाईट व लेखकाच्या विरोधात निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे करण्यात आले.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाइटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीचं लिखाण करण्यात आलेलं आहे. या लेखातील भाषा अतिशय अपमानजनक आहे त्याचा विरोध म्हणून आम्ही सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहोत , सरकारने लवकरात लवकर या वेबसाईटवर बंदी घालून वेबसाईट व लेखकावर कारवाई करावी, अशी मागणी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांनी केली आहे.

यावेळी सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, राष्ट्रवादी सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील ,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील बाळासाहेब मुळीक , सागर घोडके , तानाजी गडदे ,असिफ बावा , अतहर नायकवडी, ताजुद्दीन तांबोळी, अनिता पांगम , वंदना चंदनशिवे छाया जाधव , उत्तम कांबळे समीर कुपवाडे ,डॉ. शुभम जाधव ,अर्जुन कांबळे ,

संगीता जाधव, उषा गायकवाड छाया पांढरे ,सुनीता जगधने , विद्या कांबळे , महालिंग हेगडे ,सुरेश बंडगर, परवेज मुलाणी ,संदीप कांबळे , रामभाऊ पाटील ,संजय सरवदे ,प्रकाश सूर्यवंशी , नंदकुमार घाटगे, फिरोज मुल्ला , अकबर शेख , वाजीद खतीब , अजित दुधाळ, आकाराम कोळेकर, अमित पाटील, रोहन भंडारे , अक्षय शेंडगे ,सुकुमार पाटील आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: