Monday, December 11, 2023
HomeBreaking Newsमुंबई ब्रेकिंग | गोरेगावच्या जय संदेश पाच मजली इमारतीला भीषण आग...७ जणांचा...

मुंबई ब्रेकिंग | गोरेगावच्या जय संदेश पाच मजली इमारतीला भीषण आग…७ जणांचा मृत्यू…३९ जणांची प्रकृती गंभीर.

Spread the love

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. गोरेगावजवळील पाच मजली इमारतीला रात्री उशिरा भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 39 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मुंबईतील एचबीटी आणि कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथके तैनात आहेत.

मिळालेल्या माहितनुसार, पश्चिम गोरेगाव येथील ऑफ एमजी रोडवरील जय संदेश इमारतीत शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, इमारतीत अजूनही अनेक लोक अडकले असल्याची माहिती समोर येत असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

एएनआयने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, गोरेगावमधील पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 39 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांवर मुंबईतील एचबीटी आणि कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चार कार आणि 40 हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या
त्याचवेळी या आगीत चार कार आणि 40 हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: