Saturday, April 27, 2024
Homeराज्यजरांगे पाटील उद्या नांदेड दौऱ्यावर, सकल मराठा समाज संवाद बैठकिला करणार मार्गदर्शन...

जरांगे पाटील उद्या नांदेड दौऱ्यावर, सकल मराठा समाज संवाद बैठकिला करणार मार्गदर्शन…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

मराठा आरक्षणाची पुढील रणणिती ठरवण्यासाठी ते नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांसोबत “संवाद बैठक” घेणार असुन सदरील बैठकित ते समाजाला मार्गदर्शनपर संवाद साधण्यासाठी सायं 7.30 वाजताच्या सुमारास चांदोजी मंगल कार्यालय, कॅनल रोड नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी ते देशमुख परिवाराच्या विवाह सोहळ्यास अर्धापूर रोड वरील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय येथे हजेरी लाऊन बैठकीला येतील. सदरील तातडीच्या आणि महत्वपूर्ण बैठकीला नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आणि गावा गावातील गरजवंत मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाकडून मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी केले आहे.


Share
Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: