Monday, May 27, 2024
Homeराज्यशिवसेनेचा विजय रथ थांबणार | शिवसेनेचा बालेकिल्हा म्हणुन रामटेक लोकसभेचीं ओळख...

शिवसेनेचा विजय रथ थांबणार | शिवसेनेचा बालेकिल्हा म्हणुन रामटेक लोकसभेचीं ओळख…

पक्षश्रेष्ठीने दाखवीला विश्वास : सौ. रश्मीताई बर्वे

रामटेक – राजु कापसे

लोकसभा च्या निवडणूक ची धुमाकूळ सुरु असताना जागा वाटप साठी पार्टी मध्ये रसिखेच सुरु होती. पहिल्या टप्यातील निवडणूक ही येत्या १९ एप्रिल ला होत असल्यावर येत्या २७ ताऱखील निवडणूक फार्म भरण्याची अंतिम तारीख आहे.

लोकसभा निर्वाचन रामटेक क्षेत्रात महाविकास आघाडी व महायुतीतील उमेदवार निश्चित झालेले नस्तांना त्यामुळे उमेदवारी कोणाला ? असा संभ्रम असला तरी काँग्रेस चे लोकसभा उमेदवार सौ. रश्मीताई बर्वे यांचे नाव निश्चित होण्याचे संकेत मिळाले असल्याच्या मतदार संघात चर्चा होत होती. काँग्रेस कडून त्यांना उमेदवारी देण्यात आली.

१८व्या लोकसभेची मुदत जून २०२४ मध्ये समाप्त होत असल्याने तत्पूर्वी लोकसभा अस्तित्वात यावी. या करिता निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून प्रथम टप्प्यात पूर्व विदर्भातील ५ लोकसभा निर्वाचन क्षेत्रात निवडणूक होऊ घातली आहे. त्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ लोकसभा निर्वाचन क्षेत्रात लोकसभेची निवडणूक होणार आहे.

या लोकसभा निर्वाचन क्षेत्रात भाजपा कडून महिलांना तिकीट देण्यात आली नाही. तर काँग्रेस कडून रामटेक व चंद्रपूर ह्या २ लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून महिलांना तिकीट देऊन लोकसभेत जाण्याची संधी दिली असल्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी कोण प्रयत्नरत आहे. याचा प्रत्यय आला आहे त्यासाठी २० मार्च ते २७ मार्च पासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार असून १९ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.

प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजपाने मित्र पक्षाशी आघाडी करून महायुती तर काँग्रेस आणि मित्र पक्षाची महाविकास आघाडी निवडणूक लढणार असून ज्या लोकसभा निर्वाचन क्षेत्रात ज्या पक्षाचा जनाधार आहे. त्या घटक पक्षास उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रात सत्ताधारी पक्षातील शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच विरोधी पक्षातील काँग्रेस चा मतदार संघावर प्रभाव असल्यामुळे काँग्रेस व शिवसेना शिंदे गट च्या उमेदवारात थेट लढत होईल.

सौ. रश्मीताई बर्बे यांच्या परीचय

रामटेक काँग्रेसच्या उमेदवार सौ रश्मीताई बर्वे या माजी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्या पारशिवनी तालुक्यातील टेकाडी जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य असून याच टर्ममध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आरूढ होताच बर्वे या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आल्या. २०१२ मध्येही त्या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढल्या होत्या.

मात्र तेव्हा त्यांचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला होता.असे असले तरी रश्मी बर्वे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत जिल्ह्याच्या नागरिकांसाठी चांगले निर्णय घेतले. यात अनेक उपक्रम आणि स्थानिकांचे मन जिंकण्यात कसोशीने प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे स्थानिकांमध्ये बरेच नाव चर्चेत आहे.

पूर्ण जिल्हा मध्ये त्यांचा चांगला दांडगा परिचय आहे. त्यावरून सुनील केदार गटाकडून सौ रश्मीताई बर्वे यांचे नाव वर्ष भरापूर्वीच रामटेकच्या उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले होते.

अलीकडे या मागणीच जोर वाढला असता काँग्रेस पक्षश्रेष्ठींना याबाबत सकारात्मक विचार करत अखेर सौ रश्मीताई बर्वे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला व त्यांना रामटेक लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. सौ रश्मीताई बर्वे यांनी पक्षश्रेष्टी व पदाधिकारी चे आभार मानले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments