Wednesday, May 8, 2024
Homeराज्यवादळी वाऱ्याने घरांची पडझड...

वादळी वाऱ्याने घरांची पडझड…

Share

रामटेक – राजू कापसे

दिनांक ३ जुन ला दुपारी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान शहरासह परीसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने अचानक हजेरी दिली. वाऱ्याची गती एवढी भयंकर होती की यात तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावांमध्ये नागरीकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले.

दरम्यान तालुक्यातील काचुरवाही ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या खोडगाव येथील श्री भास्कर नागोसे यांचे घरावरील टिनाचे शेड उडुन घरातील अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तसेच श्री हरिचंद्र सौसाखरे व गोपिचंद सौसाखरे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान यावेळी उपसरपंच शिशुपाल अतकरे यांनी नुकसानग्रस्त झालेल्या घरी जाऊन चौकशी केली. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी नुकसानग्रस्त नागरीकांची अपेक्षा आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: