Friday, April 26, 2024
HomeHealthHealth | मासिक पाळी दरम्यान महिलांनी काय खावे...या ७ गोष्टी जवळ ठेवा...

Health | मासिक पाळी दरम्यान महिलांनी काय खावे…या ७ गोष्टी जवळ ठेवा…

Share

Health – महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. या काळात त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. पीरियड्स दरम्यान त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्याचा महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

मासिक पाळीत रक्तस्त्राव झाल्यास शरीरात पौष्टिकतेची कमतरता देखील होऊ शकते. यामुळे मूड स्विंग, चिडचिड आणि इतर भावनिक असंतुलन होऊ शकते. मासिक पाळीच्या काळात या समस्या टाळण्यासाठी पोषणतज्ञ सांगतात की, महिलांना काही पदार्थ (फुड्स फॉर पीरियड्स) खाण्याचा सल्ला देतात आणि त्यांचे फायदेही सांगतात.

केळी खाण्याचे फायदे…
मासिक पाळीच्या दरम्यान वेदनादायक क्रॅम्पचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांमध्ये काम करण्याची उर्जा उरलेली नसते अश्यावेळी केळी खाल्ल्याने या दोन्ही समस्यांपासून आराम मिळतो.

बीट रस…
मासिक पाळीच्या रक्तस्रावामुळे शरीरात अशक्तपणा येऊ शकतो. यामुळेच महिलांना एनिमियाचा धोका अधिक असतो. मासिक पाळीच्या वेळी बीटरूटचा रस पिण्याचे फायदे लोह आणि फॉलिक एसिड मिळते, ज्यामुळे रक्त तयार होण्यास मदत होते.

टरबूज आणि काकडी…
टरबूज आणि काकडी हे पोटासाठी खूप चांगले पदार्थ आहेत. मासिक पाळीत पोट फुगण्याची समस्या असल्यास या फळांचे सेवन करावे. पोषणतज्ञ त्यांना सूज दूर करण्यासाठी योग्य मानतात.

पीरियड्स वेदना कमी करण्यासाठी लिंबू-पुदिना पाणी प्या. तर, मासिक पाळीच्या क्रॅम्पसाठी, मासिक पाळी दरम्यान दररोज 8-9 भिजवलेले मनुके खा. यामुळे वेदने पासून लवकर आराम मिळेल.

या फायद्यासाठी डार्क चॉकलेट खा…
मासिक पाळीच्या काळात महिलांना मूड स्विंगचा त्रास होतो. ज्यासाठी पोषणतज्ञ डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला देतात. हे आनंदी हार्मोन वाढवण्यास मदत करते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: