Saturday, April 27, 2024
Homeविविध“ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन” जीवन जगण्याची प्रेरणा ग्रंथ देतात डॉ. प्रतिमा इंगोले...

“ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन” जीवन जगण्याची प्रेरणा ग्रंथ देतात डॉ. प्रतिमा इंगोले…

Share

अकोला – संतोषकुमार गवई

जीवन जगण्याची प्रेरणा ग्रंथ देतात म्हणून प्रत्येक गावा गावातील ग्रंथालयांनी वाचकापर्यंत पोहोचून वाचन संस्कृती जोपासावी असे भावो भावोद्गार व-हाडी मराठी साहित्यीक डॉ. प्रतिमा इंगोले यांनी ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व्दारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अकोला आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना व्यक्त केले.

प्रतीमा इंगोले पुढे म्हणाले की, ग्रंथात अशी शक्ती आहे की, समाजातील सर्जनशील नागरीक घडवण्याचे सामर्थ्य ग्रंथोत्सवातुन मीळते. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन अमरावती विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक, राजेश पाटील यांनी केले याप्रसंगी प्रमुख अतिथी शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. आशिष राऊत, ग्रंथ मित्र डॉ. सत्यनारायण बाहेती, अनुराग मिश्र, जिल्हा ग्रंथालय संघाचे समाधान इंगळे, ग्रंथालय निरीक्षक राजेश कोलते, राम मुळे,

तालुका क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे, यांनी केले प्रास्ताविकात अकोला जिल्ह्यातील कार्यरत ग्रंथालयांना ग्रंथोत्सवातुन ऊर्जा मिळण्याकरिता व वाचन संस्कृती जपण्याकरिता ग्रंथ ग्रंथोत्सवाचे आयोजन केल्याचे सांगितले ग्रंथोत्सव उद्घाटना सोबत विविध ठिकाणाहून ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल मांडले होते, त्यात साईज्योती पब्लिकेशन नागपुर, मधु विजय ट्रेडर्स सावदा,

सार्थक बुक सेलर अकोला, सारंग पुस्तकालय नागपूर, विद्याधन बुक सेंटर पुसद, साहित्य संहयोग अकोला, यांनी विविध प्रकारची दर्जेदार पुस्तकाची मेजवानी अकोलेकर यांना दिली. या स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमाला हार बुके न देता ग्रंथ व संमानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन राजेश डांगटे यांनी केले दुसऱ्या सत्रात मराठी भाव गीताचा कार्यक्रम कु. आचल सदार या मुलीने गाजविले द्वितीय सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

वाचन संस्कृतीवर सोशल मीडीयाचा प्रभाव या विषयावर परिसंवाद रंगला परिसंवादाचे अध्यक्षस्थानी डॉ. एस आर बाहेती होते या सीताबाई कला महाविद्यालयाचे ग्रंथपाल अशोक सोनोने व सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालांनी सहभाग घेतला परिसंवादाचे संचालन मनोज देशमुख यांनी केले आभार कैलास गाव्हाळे यांनी मांनले दुसरा दिवस बाई पण भारी देवा रंगणार 22 मार्चला ग्रंथोत्सवाचा दुसरा दिवस गाजणार आहे. प्रथम सत्रात छु लो असमान या सत्रात आदर्श शिक्षक नितीन शेगोकार स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच करिअर अकॅडमी चे अनिल हांडे मार्गदर्शन करणार आहेत. द्वितीय सत्रात बाई पण भारी देवा हा एक पात्री नाट्य प्रयोग हर्षदा इंदाने सादर करणार असून विविध कारण कार्यक्रमाची रेल चेल होणार आहे व सायंकाळी 5 वा. ग्रंथोत्सवाची समारोप होणार असुन या कार्यक्रमाचा वाचक प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अतुल वानखडे, यांनी केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: