Saturday, May 11, 2024
Homeसंपादकीयगडकरी साहेब !…मूर्तिजापूर शहरातील सिमेंट रस्ता ५० वर्ष टिकेल का?....

गडकरी साहेब !…मूर्तिजापूर शहरातील सिमेंट रस्ता ५० वर्ष टिकेल का?….

Share

देशाचे लोकप्रिय नेते तथा केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी काल परवा मूर्तिजापूर येथे विविध भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी आले असतांना यावेळी जाहीर भाषणात मूर्तिजापूर ते खेर्डा मार्ग आता सिमेंटचा होणार असल्याने हा रस्ता 50 वर्ष खराब होणार नाही, यावर खड्डेही पडणार नाहीत, अशी ग्वाही यांनी दिली सोबतच आमदाराचे वजन वाढणार असल्याची चिंताही व्यक्त केली. वजन कशाने वाढते हे सर्वानांच चांगले ठाऊक आहे, गडकरी साहेबांनी सोडलेला बाण योग्य ठिकाणी लागला म्हणूनच लोकांमध्ये हशा पिकला. याच कार्यक्रमात गडकरी साहेबांनी मुरूम चोरट्याचा सुद्धा सत्कार केला ज्याने मुरूम चोरीचा दंडही भरला होता. पण मूर्तिजापूर शहरातील ज्याने सुंदर, प्रशस्त सिमेंट रस्ता तयार करणाऱ्या त्या ठेकेदाराचा आणि सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचा सत्कार करणे विसरले म्हणून मूर्तिजापूरकरांची नाराजी झाली पण या जागतिक दर्जाच्या रस्ताचे गिनीज बुकात नाव नोंदवा अशी मागणी कदाचित शहरवासी आपल्याकडे करतीलच.

मूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्ताच्या कांक्रीटीकरणाची जुलै 2017 पासून सुरुवात झाली तरी आजपर्यंत हा रस्ता पूर्ण झाला नाही. मागील जुलै 2023 ला 6 पूर्ण झाले आणि हे 7 वर्ष सुरु आहे. हा रस्ता जर सात वर्षात झाला नाही तर कधी होणार हेही सांगता येत नाही. 1.7 किलोमीटर असलेल्या रस्त्यासाठी २३ कोटी ३७ लाख रुपये खर्च करुन सुद्धा पैश्याची कमतरता आली कशी? तरीपण रस्ता अपूर्णच. रस्त्यावर अजून स्ट्रीट लाईट नाहीत, रस्ताही कुठ कमी कुठ जास्त, डिव्हाव्हर व्यवस्थित नाही, फक्त रस्ताच आहे तोही ओबडखाबड. मुख्य म्हणजे 90 फुट रुंद असलेला रस्ता हा अचानक कमी झालाच कसा? तर रस्त्याच्या मधातील सौंदर्यकरणासाठी असलेली जागा कोणाच्या पत्राने कमी करण्यात आली. यावर RTI कार्यकर्ते मनोज जावरकर यांनी पूर्ण माहितच बाहेर काढली होती.

रस्त्याच्या चौपदरीकरणातील कामातंर्गत प्रस्तावीत 1.20 मीटर रुंदी ऐवजी प्रत्यक्षात 0.45 मीटर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. याच रस्त्याच्या कामात भ्रष्ट्राचार झाल्याचे बरेच आरोप करण्यात आलेत. अनेक तक्रारी करण्यात आल्या होता मात्र आता कोणीच तक्रारही करत नाही. एखाद्याने तक्रार केली तर भाऊचे दोन चार चमचे मध्ये येवून सगळ प्रकरण बरोबर करून मोकळे होतात. याच रस्त्यासाठी काही नगरसेवकांनी भाऊच्या शिव्या खाल्ल्या पण कोणाचीही या रोडसाठी आवाज उचलण्याची हिम्मत झाली नाही. हा रस्ता कोणत्या दर्जाचा आहे हे सर्वाना कळते पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.

मूर्तिजापूरच्या जनतेसाठी लोकप्रतिनिधी म्हणजे देवच आणि देवाला कोणीही काही बोलू नका, काही मागुही नका अशी येथील जनतेची भावना आहे. एखाद्याने प्रश्न उपस्थित केले कि त्याला मानसिक त्रास किंवा जर भाड्याने राहत असेल तर घरमालकाला घर खाली करून घेणे, धमक्या देणे असले उद्योग येथील लोकप्रतिनिधी करतात म्हणूनच येथे विकास होत नाही….


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: