Monday, May 6, 2024
HomeBreaking Newsवंचित बहुजन आघाडीला राहुल गांधीचे पत्र...पत्रात काय म्हणाले?...तर वंचितने मानले आभार...

वंचित बहुजन आघाडीला राहुल गांधीचे पत्र…पत्रात काय म्हणाले?…तर वंचितने मानले आभार…

Share

न्यूज डेस्क : वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण पाठविले होते तर आजरोजी २५ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे ही संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली असल्याने राहुल गांधी यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून वंचित आघाडीला शुभेछासह न येण्याचे कारण सांगितले आहे. तर वंचित आघाडी कडून सुद्धा राहुल गांधीचे आभार मानत त्यांना व त्यांच्या पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हणाले की, @Prksh_Ambedkar संविधान सन्मान महासभेच्या निमंत्रणासाठी मी तुमचे आभार मानू इच्छितो. संविधान दिनाच्या स्मरणार्थ महासभा आयोजित केल्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अभिनंदन करू इच्छितो. आज आपण एका गंभीर मार्गावर आहोत. गेल्या नऊ वर्षांत आपण आपल्या घटनात्मक मूल्यांवर सातत्याने हल्ला होत असलेला पाहिला आहे. सध्याच्या स्थितीत या सविंधनिक मुल्याचे रक्षण करणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी बनली आहे. पण दुर्दैवाने, माझ्या सध्या सुरू व्यस्त कामकाजामुळे मी आजच्या संविधान सभेला उपस्थित राहू शकणार नाही. मी वंचित बहुजन आघाडीला त्याच्या आणि तुमच्या भावी प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असे राहुल गांधी म्हणाले.

तर वंचित आघाडीकडून राहुल गांधी यांना X वर पोस्ट करीत म्हटले…राहुल गांधी, संविधान सन्मान महासभेच्या आमच्या निमंत्रणासाठी. त्यांच्या चालू असलेल्या मोहिमेमुळे ते सभेला उपस्थित राहू शकले नाहीत हे दुर्दैवी असले तरी आणि त्यांनी कॉंग्रेस कडून पर्यायी नाव सुचविले नाही, तरी आम्हाला लिहिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या शुभेच्छा आणि निवडणुकीत त्यांना आणि काँग्रेसच्या यशासाठी शुभेच्छा….


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: