Saturday, May 4, 2024
Homeराज्यअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी...

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…

Share

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. नाशिक शाखेची ‘अ डिल’ एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. अमरावती शाखेच्या ‘मधूमोह’ या एकांकिकेस निर्मितीचे उत्कृष्ट तर इचलकरंजी शाखेच्या ‘हा वास कुठून येतो’ या एकांकिकेस उत्तम तर अहमदनगर शाखेच्या ‘जाहला सोहळा अनुपम’ या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

पारितोषिक वितरण नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त श्री. शशी प्रभू, विश्वस्त श्री. अशोक हांडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेत्री व नियामक मंडळ सदस्य निलम शिर्के-सामंत , सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष श्री. विजय गोखले, अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी अनेक कलावंत व नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते. स्पर्धेत लेखन व दिग्दर्शनाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक नाशिक शाखेचे आनंद जाधव यांना उत्कृष्ट दिग्दर्शन दीपक नांदगावकर, अमरावती शाखा यांना तर उत्तम दिग्दर्शक पारितोषिक इचलकरंजी शाखेचे अनिरूद्ध दांडेकर यांना मिळाले.

सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक विश्वंभर पईरवाल व पूजा पुरकर, नाशिक यांना तर उत्कृष्ट अभिनयासाठी हर्षद ससाणे व वैष्णवी राजभूरे, अमरावती यांना तर उत्तम अभिनयासाठी प्रतीक हुंदारे व मानसी कुलकर्णी, इचलकरंजी यांना पारितोषिक देण्यात आले.

तर अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र सौरभ कुलकर्णी अहमदनगर, अशोक किल्लेदार सोलापूर, ॲड. दीपक शर्मा अहमदनगर, अभिषेक लोले इचलकरंजी, विजयालक्ष्मी कोकणे सोलापूर, अपर्णा जोशी, सोलापूर यांना देण्यात आले. नेपथ्यसाठी सर्वोत्कृष्ट निखिल शिंदे इचलकरंजी, उत्कृष्ट नेपथ्य रोहित जाधव नाशिक, उत्तम नेपथ्य अमोल खोले,

अहमदनगर यांना तर प्रकाशयोजनेसाठी उत्तम पारितोषिक अनिरुद्ध दांडेकर इचलकरंजी, उत्कृष्ट पारितोषिक ॲड.चंद्रशेखर डोरले, अमरावती तर सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना पारितोषिक कृतार्थ कंसारा, नाशिक यांना देण्यात आले. पार्श्वसंगीत उत्तम पारितोषिक प्रवीण लायकर इचलकरंजी, उत्कृष्ट पारितोषिक मिलिंद कहाळे अमरावती तर पार्श्वसंगीत सर्वोत्कृष्ट पारितोषिक ओम देशमुख, नाशिक यांना देण्यात आले.

याप्रसंगी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे म्हणाले, महाराष्ट्रातील हौशी, प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारे कलावंत खूप मेहनतीने काम करतात. मुंबई येथील व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना कलावंतांच्या निवासाची व्यवस्था मुंबईत होत नाही. याकरिता परिषदेच्या माध्यमातून निवास व्यवस्थेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी सांगितले की, नाट्य परिषदेच्या शाखा सक्षम करण्यासाठी नवनवीन योजना राबविण्यात येणार आहेत. एकांकिका हे माध्यम व्यावसायिक नाट्यक्षेत्रात पदार्पण करण्याचे उत्तम माध्यम आहे. नाट्यकला, नाट्यशास्त्र शिकविणे कामी नाट्य परिषद नाट्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांनी शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवायचे असेल तर बालनाट्य, एकांकिका व कला क्षेत्रातील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. या स्पर्धेत २५ शाखांनी भाग घेतला होता.

यास्पर्धेचे परिक्षण श्री. प्रदीप मुळ्ये , डॉ. अनील बांदिवडेकर, श्री. देवेंद्र पेम, शीतल तळपदे, शीतल करदेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके यांनी केले तर आभार स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: