Monday, December 11, 2023
Homeगुन्हेगारीकुत्र्याचा भुंकण्याचा त्याला एवढा राग की...केलं अमानवीय कृत्य...

कुत्र्याचा भुंकण्याचा त्याला एवढा राग की…केलं अमानवीय कृत्य…

Spread the love

न्यूज डेस्क : अनेकजन घरात कुत्र्याला एखाद्या लहान मुलाप्रमाणे वागवतात तर त्याच्या भुंकण्याचा आवाज शेजाऱ्यांना आवडत नाही त्यामुळे भांडणे होतात. अशीच एक घटना समोर आली आहे. भुवनेश्वरमध्ये कुत्र्याचा खासगी भागात भोसकल्याची अमानवीय घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीला कुत्र्याच्या भुंकण्याने इतका राग आला की, त्याने रस्त्याने जात असलेल्या २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केला आणि कुत्र्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.

भुवनेश्वरमध्ये गुरुवारी भरदिवसा ही घटना घडली. चंदन नायक नावाच्या व्यक्तीने कुत्र्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या व्यक्तीने कुत्र्याच्या प्रायव्हेट पार्टला रॉडने भोसकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिलेने राजधानी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींना अटक करण्याची मागणी
पीडित महिलेने राजधानी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. महिलेचे म्हणणे आहे की, चंदन नायक आणि त्याच्या वडिलांनी दुपारी माझ्या घराबाहेर आरडाओरडा केला. मी कारण विचारण्यासाठी गेले असता चंदनने मला शिवीगाळ करून त्याच्या पाळीव कुत्र्याला गप्प बसण्यास सांगितले.

महिलेने सांगितले की, जेव्हा तिने कुत्र्याला शांत करण्यास नकार दिला तेव्हा चंदनने तिला रस्त्यावर ओढले. त्याने माझे कपडे फाडले आणि मला नग्न केले. त्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याच्या वडिलांनी मला यात मदत केली.

लवकरच कार्यवाही करणार
महिलेच्या म्हणण्यानुसार, त्याने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने सांगितले की, याशिवाय चंदनने लोखंडी रॉडने प्राण्याचे प्रायव्हेट पार्ट भोसकले. राजधानी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक पद्मनव प्रधान यांनी सांगितले की त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. आम्ही लवकरच आरोपींवर कायदेशीर कारवाई करू.


Spread the love
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: