Thursday, November 30, 2023
Homeराज्यआलापल्लीत भाजपा कार्यकर्त्यांनी केली निदर्शने...

आलापल्लीत भाजपा कार्यकर्त्यांनी केली निदर्शने…

Spread the love

कंत्राटी भरती वरून खोटे आरोप लावणाऱ्या काँग्रेस व महाविकास आघाडीचा केला निषेध.

अहेरी – 2010 मध्ये लागू केलेल्या कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कंत्राटी भरती संदर्भात खोटे आरोप लावणाऱ्या काँगेस व महाविकास आघाडीचा आलापल्ली येथील वीर बाबुराव चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी निर्दशने करून प्रचंड घोषणाबाजी करीत निषेध केला.

काँग्रेस सरकारने 2010 मध्ये विविध नोकर भरतीत कंत्राटी पद्धत आणली त्यामुळे त्याचं पाप लादण्याचा प्रयत्न ते या शिंदे सरकारवर करीत आहेत याचा अहेरी तालुका भाजपा तर्फे निषेध करण्यात आला.

यावेळी निदर्शने करतांना भाजपा तालुका अध्यक्ष विनोद अक्कनपल्लीवार,प्रदेश सदस्य रवी ओल्लालवार सागर डेकाटे यु.वा जिल्हा महामंत्री, पोषालू सुधरी जिल्हा उपाध्यक्ष, मोहन मदने जिल्हा सचिव, फ्रँकलिन सल्लम, शहर अध्यक्ष,

देवेंद्र खतवार तालुका महामंत्री, सचिन येरोजवार, रहिमा सिद्दीकी प्रदेश सदस्य,शकुंतला दुर्गम दलीत आघाडी महिला तालुका अध्यक्ष, मधुकर रापर्तीवार,शंकर येमालकुर्तीवर , संजय उईके, कमल अन्मुलवार, माया बासानवार,सरला थुल,सलमा शेख आदींची उपस्थिती होती.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: