Monday, May 6, 2024
Homeराज्यना. नितीन गडकरी यांना व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनाचे निमंत्रण...

ना. नितीन गडकरी यांना व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनाचे निमंत्रण…

Share

रामटेक – राजु कापसे

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने १८ व १९ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे राज्यातील पत्रकारांचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी आज व्हॉईस ऑफ मीडियाच्या नागपूर व विदर्भ टीमने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित केले.

ना. गडकरी यांनी पत्रकारांच्या या अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या. निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिवेशनात सहभागी होऊ, असे त्यांनी सांगितले.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी सुरू असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली तसेच संघटनेची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ ने दाखल घेतली, याबद्दलही अभिनंदन केले.

या भेटीत व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ संघटक आनंद आंबेकर, विदर्भ कार्यकारिणीचे राजेश सोनटक्के, आकाश मुधोळकर, नागपूर शहर सदस्य तेजस्विनी घाडगे, शुभम बोरघरे उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: