Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयहिंगोली लोकसभा मतदारसंघातील ३३ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप : नागेश पाटील, आष्टीकर...

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील ३३ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप : नागेश पाटील, आष्टीकर मशाल, बाबुराव कदम कोहळीकर…

Share

धनुष्यबाण व बि. डी. चव्हाण यांना कपाट चिन्ह

नांदेड – महेंद्र गायकवाड

15-हिंगोली लोकसभा मतदार संघात पात्र 33 उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार असून, त्या सर्व उमेदवारांना दि. 8 एप्रिल रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. उमेदवारांची नावे, पक्ष आणि चिन्हाचा तपशील पुढील प्रमाणे असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.

निवडणूक रिंगणात असलेले उमदेवार, त्यांचा पक्ष आणि चिन्हांचा तपशील :

आष्टीकर पाटील नागेश बापुराव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मशाल, गजानन धोंडबा डाळ (बहुजन समाज पार्टी)- हत्ती, बाबुराव कदम कोहळीकर (शिवसेना)-धनुष्यबाण, विजय रामजी गाभणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट)-हातोडा, विळा आणि तारा, अनिल देवराव मोहिते (अखिल भारतीय परिवार पार्टी)-किटली,

ॲड.अलताफ अहेमद (इंडियन नॅशनल लीग)-गॅस शेगडी, डॉ. बी. डी. चव्हाण (वंचित बहुजन आघाडी)-कपाट, देवसरकर वर्षा शिवाजीराव (बहुजन मुक्ती पार्टी)-खाट, देशा श्याम बंजारा (समनक जनता पार्टी)- जहाज, प्रकाश मेशराम रणवीर (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-ए)- शिवण यंत्र, रवी रामदास जाधव-सवनेकर (अभिनव भारत जनसेवा पक्ष)- शिट्टी,

सुनिल दशरथ इंगोले (भीमसेना)- ऑटो रिक्षा, हेमंत राधाकिशन कनाके (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी)- रोड रोलर, त्रिशला मिलिंद कांबळे (बहुजन समाज पार्टी-आंबेडकर)- गॅस सिलेंडर, अशोक पांडुरंग राठोड (अपक्ष)-ईस्त्री, आनंद राजाराम धुळे (अपक्ष)-ऊस शेतकरी, अंबादास सुकाजी गाडे (अपक्ष)-फलंदाज,

अ. कदिर मस्तान सय्यद (गोरेगावकर) (अपक्ष)-कॅमेरा, दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी (अपक्ष)-चिमणी, देवजी गंगाराम आसोले (अपक्ष)-कढई, बाबुराव आनंदराव कदम (अपक्ष)-बॅटरी टार्च, भवर गोविंदराव फुलाजी (अपक्ष)-फुलकोबी, महेश कैलास नप्ते (अपक्ष)-ट्रक, ॲड. रवि शिंदे (अपक्ष)-दूरदर्शन, रामप्रसाद नारायण बांगर (अपक्ष)-टेबल,

ॲड. रामराव आत्माराम जुंबडे (अपक्ष)-कोट, वसंत किसन पाईकराव (अपक्ष)-सफरचंद, विजय ज्ञानबा राऊत (अपक्ष)-जेवणाचे ताट, विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर (अपक्ष)-लॅपटॉप, ॲड. शिवाजीराव जाधव (अपक्ष)-अंगठी, सत्तार पठाण (अपक्ष)-तुतारी, सर्जेराव निवृत्ती खंदारे (अपक्ष)-माईक आणि सुनिल मोतीराम गजभार (अपक्ष)-बॅट याप्रमाणे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे, पक्ष व चिन्हे आहेत.

नांदेड जिल्ह्यातील दोन मतदारसंघ लोकसभेला हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यातील किनवट-माहूर, हदगाव-हिमायतनगर हे दोन मतदारसंघ लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात येत असून विधानसभा निवडणुकीसाठी हे मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात मोडतात. सध्या किनवट मतदारसंघात भाजप व हदगाव मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.


Share
Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: