Wednesday, May 8, 2024
Homeगुन्हेगारीसांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवर दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईलने कोट्यावधीचा धाडसी दरोडा - कोट्यवधीचे सोन्याचे...

सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवर दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईलने कोट्यावधीचा धाडसी दरोडा – कोट्यवधीचे सोन्याचे दागिने लंपास…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्स वर आज दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास 10 ते 12 जणांनी हत्यारांस दरोडा टाकत कोट्यवधींचे सोन्या चांदीचे दागिने पळवलेत. दुकानातील महिलांसह पुरुष कर्मचाऱ्यांना आम्ही क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगत,सर्वांना माहिती सांगण्याच्या बहण्याने एका ठिकाणी रुममध्ये नेऊन त्यांचे हात बांधून तोंडाला चिकट टेप लावून डोक्याला पिस्तूल लावून सदर दरोडा टाकण्यात आला. यामध्ये दुकानाच्या शोरूममध्ये असणारे सर्व दागिने लंपास करण्यात दरोडेखोर यशस्वी झाले.

दरम्यान यावेळी एक कस्टमर आत आल्यानंतर त्याच्याशी दरोडेखोरांनी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर दरोडेखोरांनी त्याच्यावर फायरिंग केले मात्र सदर गोळी दुकानाच्या काचेला लागल्यानंतर हे दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झालेयत.

अनपेक्षित पणे झालेल्या या घटनेमुळे आणि डोक्याला पिस्तूल लावल्याने अनेक कर्मचारी भीतीने गांगरून गेले होते. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत तपास कामास सुरवात केली असून, घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी भेट देऊन माहिती घेतली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: