Saturday, June 3, 2023
Homeराजकीयसोनिया गांधी यांच्या ED चौकशी विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन...

सोनिया गांधी यांच्या ED चौकशी विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन…

देशातील विरोधी पक्षाना घाबरवून सोडण्यासाठी मोदी सरकारने ईडी चौकशांचा सपाटा लावला असून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही ईडीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. ह्या तानाशाही कार्यवाहीचे निषेधार्थ आकोट मतदार संघातील काँग्रेसजनानी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्याग्रह आंदोलन केले.

यावेळी ऊपस्थित मान्यवरानी मोदी सरकारच्या अनेक चूकीच्या धोरणांची माहीती दिली. महागाई, रोजगार, शेतकरी कल्याण, युवक कल्याण, महिला सुरक्षितता या सर्व प्रश्नांवर मोदी सरकार तोंडावर आपटले आहे. देशातील जनतेला केवळ भावनांच्या आधारावर बहकविण्याचा प्रयास मोदी सरकार करीत आहे.

ह्या देशविरोधी बाबींना विरोधी पक्षाने विरोध करु नये तथा आपल्या सरकारचे अपयश जनतेच्या ध्यानी येवू नये यासाठी मोदी सरकार देशवासियांचे लक्ष विचलीत करण्यासाठी ईडीचा गैरवापर करीत आहे. विपक्षातील नेत्यांना ईडीच्या माधूयमातुन त्रास देत आहे. असाच प्रयोग भारतिय राष्ट्रिय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचेवरही करण्यात येत आहे. त्याचे निषेधार्थ संपूर्ण देशात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

आकोट- तेल्हारा या दोन्ही तालूक्यातील काँग्रेसजनानीही आकोट शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये आकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत पाचडे, जि.प. सदस्य गजानन काकड, जिल्हा उपाध्यक्ष संजय बोडखे, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष अनंत गावंडे, जिल्हा ऊपाध्यक्ष डॉ. प्रमोद चोरे, सौं. संजिवनीताई बिहाडे, आकोट पंचायत समिती माजी सभापती रमेशभाऊ आकोटकर, दिपक वर्मा, सतिष हाडोळे, रतन गूजर, सुनिल गावंडे, एड, मनोज खंडारे, संजय आठवले, राजेश भालतिलक, निनाद मानकर, जाकिर शा, कदीर शा, नागेश ईंगळे, गजानन मुंगसे, अफरोजखान पठाण, अ, कलीम अ. तमीज, प्रकाश मंगवाणी, धनराज कहार, महादेव सातपुते, गजानन वारकरी, जमील अहमद पणज, प्रतिक गोरे, केशव हेंड, अनोख राहणे, अर्पित बोरोडे, अविनाश कोरपडे, म. शफीक, जनार्दन गवई, सै. आसिफ हुसैन, म. फराहान म. रफीक, अतुल भालतिलक, सौ, रजिया पटेल, सौ. सुशिलाताई घुगे, सौ, मानकरताई, शे. महबूब अ. समद, राजाबाबू बोडखे आदी मान्यवर सहभागी होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: