Friday, September 22, 2023
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर । जीतापूर (खेडकर) येथील आरोपी विनोद घरडे यांची मारहाणीच्या व शिवीगाळीच्या...

मूर्तिजापूर । जीतापूर (खेडकर) येथील आरोपी विनोद घरडे यांची मारहाणीच्या व शिवीगाळीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता…

सदर मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना ही सन 2015 मधील असून, मुर्तीजापुर येथील गजबजलेल्या भगतसिंग चौकामध्ये आरोपी विनोद घरडे यांनी फिर्यादी इसम यांना दारू पिण्याकरिता पैसे मागितले व फिर्यादी यांनी पैसे न दिल्यामुळे घरडे यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने फिर्यादीस शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती.

त्यानंतर आरोपी विनोद घरडे यांच्याविरुद्ध मुर्तीजापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सदर खटला हा मूर्तिजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयात चालविल्या गेला.

सदर प्रकरणांमध्ये महत्त्वाचे साक्षीदार सरकारी पक्षाने तपासले. त्यानंतर सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी विनोद कानुजी घरडे यांची सदर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. आरोपी यांच्या वतीने ॲड. सचिन वानखडे यांनी युक्तिवाद केला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: