Friday, April 26, 2024
Homeकृषीआकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध पॅनल्सचे उमेदवार घोषित… व्यापारी व...

आकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध पॅनल्सचे उमेदवार घोषित… व्यापारी व आडत्ये अविरोध विजयी…

Share

आकोट – संजय आठवले

आकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत नामांकन मागे घेण्याचे अंतिम दिवशी या निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांची एकच झुंबड उडाली असून अनेकांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. त्यामुळे सर्वच पॅनल्सनी आपापले उमेदवार घोषित केल्याने या लढाईचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या मैदानात आता शेतकरी, कास्तकार, सहकार आणि जय किसान या चार पॅनल्सची चौरंगी लढत पक्की झाली आहे.

वंचित आघाडीने यापूर्वीच कास्तकार पॅनलशी हात मिळवणी केल्याने कास्तकार पॅनल मधून वंचितच्या पाच लोकांना उमेदवारी दिली गेली आहे. आडत्ये आणि व्यापारी मतदारसंघात रितेश अग्रवाल आणि सुनील गावंडे या दोघां व्यतिरिक्त सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने हे दोघे अविरोध विजयी झाले आहेत. तर हमाल मतदार संघात पाच उमेदवार कायम असून एका संचालक पदाकरिता या मतदारसंघात निवडणूक होणार आहे.या चारही पॅनेल्सने पुढील प्रमाणे आपापले उमेदवार घोषित केले आहेत.

जय किसान पॅनल तर्फे सहकारी संस्था मतदार संघातून गजानन पुंडकर, दिलीप गायकवाड, प्रशांत गावंडे, मनोहर डोके, मदन रोकडे, रघुनाथ खेडकर, गोवर्धन म्हसाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महिला राखीव मतदार संघात सौ शारदाताई दोड व इंदुताई टोहरे यांना तर इतर मागासवर्गीयांमधून प्रदीप कुलट आणि भटक्या विमुक्त जाती मधून रतनलाल तायडे तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात संदीप चौधरी व बाळासाहेब खोटरे यांना उमेदवारी दिली आहे. अनुसूचित जाती जमाती मधून गजानन ताराम आणि आर्थिक दुर्बल घटक मधून गोपाल रावणकार यांना उमेदवारी दिली आहे.

शेतकरी पॅनल ने सहकारी संस्था मतदार संघातून संजय गावंडे, डॉ. प्रमोद चोरे, ज्ञानेश्वर दोड, किशोर आवारे, राजेश भालतिलक, निळकंठ मेतकर व सुरेश दोड यांना उमेदवारी दिली आहे. महिला राखीव मधून सौ. हरीदिनी वाघोडे व सौ. राधिका अरबट यांना तर इतर मागासवर्गीय मतदार संघात डॉ. गजाननराव महल्ले आणि भटक्या विमुक्त जाती मतदारसंघात तसलीमशा लुकमानशा तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात शरद नहाटे व शाम गावंडे यांना उमेदवारी दिली आहे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून पांडुरंग तायडे तथा आर्थिक दुर्बल मतदार संघातून प्रवीण डिक्कर यांना उमेदवारी दिली आहे.

सहकार पॅनलने सहकारी संस्था मतदार संघातून शाम तरोळे, गजाननराव डाफे, विजयराव राहणे, बाबुराव इंगळे, धीरज हिंगणकर, प्रशांत पाचडे व अतुल खोटरे यांना उमेदवारी दिली आहे. महिला राखीव मधून सौ. अंजली सोनोने व अरुणा आतंकड यांना तर इतर मागासवर्गीय मधून अविनाश जायले आणि भटक्या विमुक्त जातीमधून रमेशराव वानखडे तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण मधून गोपाल सपकाळ आणि कुलदीप वसु यांना उमेदवारी दिली आहे.

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून प्रमोद खंडारे तर आर्थिक दुर्बल मतदारसंघातून शंकरराव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे.कास्तकार पॅनलने सहकारी संस्था मतदारसंघातून अतुल म्हैसने, कैलास मेतकर, मनोहर कुलट, विलास वसु, संजय पुंडकर, राजू शेंडे व दादाराव पेठे यांना उमेदवारी दिली आहे.

महिला राखीव मतदार संघातून सौ, वंदना गावंडे व सौ, सुनीता फसाले यांना तर इतर मागासवर्गीयातून राजेश मंगळे आणि भटक्या विमुक्त जाती मधून काशीराम साबळे तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून निखिल गावंडे व प्रदीप वानखडे यांना उमेदवारी दिली आहे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून एडवोकेट भूषण घनबहादूर तर आर्थिक दुर्बल मतदारसंघातून विलास साबळे यांना उमेदवारी दिली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: