Thursday, April 25, 2024
Homeराज्यभाजप महिला आघाडीने सुरू केली नागपुरातील महिलांसाठी हॅल्लो यशस्विनी हेल्पलाईन…

भाजप महिला आघाडीने सुरू केली नागपुरातील महिलांसाठी हॅल्लो यशस्विनी हेल्पलाईन…

Share

ना. गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

महिला अध्यक्ष प्रगती पाटील यांची संकल्पना….

नागपूर – शरद नागदेवे

नागपुरातील महिलांना उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे या हेतूने भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने ‘ हॅलो यशस्विनी – 9545759966’ या हेल्पलाईनचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास ठाकरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी महापौर संदीप जोशी, भाजप महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष प्रगती पाटील, महामंत्री सारिका नांदुरकर, प्रीती राजदेरकर, वर्षा चौधरी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, भाजप महिला आघाडीने सुरू केलेली हेल्पलाईन महिलांना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून शहरातील महिलांनी याचा स्वविकासासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महिला आघाडीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. केवळ महिलांना एकत्रित करून महिला दिनाचा औपचारिक कार्यक्रम घेण्यापेक्षा महिलांच्या उत्कर्षासाठी महिला दिनी हेल्पलाईन सुरू करत नवा पायंडा घातला, याबद्दल महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष प्रगती पाटील यांच्यासह सर्व सदस्य कौतुकास पात्र असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष प्रगती पाटील यांनी हॅलो यशस्विनी हेल्पलाईनची संकल्पना समजावून सांगितली. आयुष्यात यशस्वी होऊ पाहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी ही हेल्पलाइन असल्याचे त्यांनी सांगितले. महिला व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला भाजप तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप महिला आघाडी तर्फे सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचा उपयोग करण्यासाठी ९५४५७५९९६६ हा क्रमांक डायल करावा लागेल. उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन यावरून महिलांना घेता येईल. ही हेल्पलाइन सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यरत राहील. महिलांनी कॉल केल्यास त्यांचा नंबर नोंद होईल व त्यावर कॉल सेंटर वरून संपर्क साधण्यात येईल.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: