Wednesday, May 8, 2024
HomeराजकीयBJP candidate Exchange | लातूरमध्ये सुधाकर शृंगारे बाबत नाराजी…लोकसभेचा लातूरचा भाजप उमेदवार...

BJP candidate Exchange | लातूरमध्ये सुधाकर शृंगारे बाबत नाराजी…लोकसभेचा लातूरचा भाजप उमेदवार बदलण्याची चर्चा…

Share

BJP candidate Exchange : लातूर लोकसभा मागच्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असताना यावेळेस सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने आणि काँग्रेसने शृंगारे यांच्याबाबत असलेल्या नाराजीचा फायदा उचलत उच्च शिक्षित डॉ.शिवाजी काळगे याना उमेदवारी दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे उमेदवारांबद्दलच्या नाराजीबाबत भाजप महाराष्ट्रातील चार उमेदवार बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून यात लातूर,वर्धा,जळगाव,माढा या जागांचा समावेश असल्याचे विश्वस्तनीय वृत्त आहे..

लातूर लोकसभा ही कायम उच्चशिक्षित उमेदवारांची राहिली आहे या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रतिनिधींत्व केले आहे..लातूर एक सुशिक्षित असलेला मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात आता काँग्रेस उमेदवारींमुळे रंगत आली असून मतदारांनी ही निवडणूक चक्क सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित अशी करून टाकली आहे. त्यामुळे लातूर लोकसभेत भाजपचे खासदार शृंगारे अडचणी वाढल्या आहेत. उमेदवारी मिळाल्यावर पत्रकारांनी विकासकामांवर प्रश्न विचारला असता खासदार शृंगारे म्हणाले पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे मी विजयी होणार,त्यांना कुठलीही ठोस कामे सांगता आली नाहीत. जिल्ह्याची आजवरची उच्चशिक्षित परंपरा पाहता काँग्रेसने यावेळेस चांगला पर्याय दिलेला दिसून येत आहे.

तर दुसरीकडे भाजप मधून माजी खासदर डॉक्टर सुधीर गायकवाड यांचे पुतणे विश्वजीत गायकवाड यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय वारसा लाभलेले विश्वजीत गायकवाड राजकारणासोबतच समाजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय असून या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून विश्वजीत गायकवाड यांचे नाव चर्चेत होतं.

त्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठीकडून महाराष्ट्रातील चार ते पाच जागांवर तिकिटे बदलण्याची चर्चा सुरू असून त्यात लातूर आघाडीवर आहे. त्यामुळे लातूरमध्ये शृंगारे यांच्या ऐवजी विश्वजीत गायकवाड यांची वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: