Thursday, April 25, 2024
Homeराज्यप्रलंबित दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्निर्माण प्रकरणी उद्याच बैठक बोलविणार - मा दीपक केसरकर...

प्रलंबित दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्निर्माण प्रकरणी उद्याच बैठक बोलविणार – मा दीपक केसरकर…

Share

मुंबई – गणेश तळेकर

सहकारी मनोरंजन मंडळाच्या शिष्टमंडळाने आज एफ दक्षिण विभागाच्या सभागृहात मा पालकमंत्री श्री. दिपकजी केसरकर यांना पुन्हा एकदा निवेदन दिले. किमान 1000 आसन क्षमतेचं दामोदर नाट्यगृह बांधण्यात यावे, सहकारी मनोरंजन मंडळाला नवीन नाट्यगृहात1000 स्केअर फूट चे कायमस्वरूपी कार्यालय देण्यात यावे.

शाळा आणि नाट्यगृह यांचे एकाच वेळी बांधकाम सुरू व्हावे. त्यासाठी नव्याने सुधारित आराखडा बनवण्यात यावा असे आदेश मा. शालेय शिक्षण मंत्र्यांनी दि. 7 फेब्रुवारी 2024 च्या महापालिका मुख्यालयात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत दिले होते. तसेच तोपर्यंत सहकारी मनोरंजन मंडळाचा खंडित वीज आणि पाणी पुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याचे आदेश त्यांनी संबंधीतांना दिले होते.

आदेश देऊन महिना उलटून गेला तरीहीमहापालिका वा सोशल सर्विस लीग कडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने सहकारी मनोरंजन मंडळाच्या शिष्टमंडळाने आज एफ साऊथ महापालिका कार्यालयात झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमात श्री दिपकजी केसरकर यांची भेट घेतली. व दामोदर नाट्यगृह प्रश्नी त्वरित कार्यवाही ची मागणी केली.

त्यावर बोलताना 1000 आसन क्षमतेचे नवीन दामोदर नाट्यगृह, त्यात सहकारी मनोरंजन मंडळाला कायमस्वरूपी जागा तसेच नाट्यगृह आणि शाळा दोन्हींचे एकाचवेळी बांधकाम सुरू करण्याचा पुनरुच्चार मा. दिपकजी केसरकर यांनी केला. याप्रश्नी दुसऱ्या दिवशी लगेच संबंधित महापालिका अधिकारी व सोशल सर्विस लीगच्या पदाधिकाऱ्यां बैठकीस बोलावून त्यांना त्यासंबंधीत निर्देश देण्याचे त्यांनी मान्य केले.

नवीन वास्तू होईपर्यत सहकारी ला योग्य पर्यायी जागा आणि नव्या वास्तूत सहकारी ला कायमस्वरूपी मालकी हक्काने जागा मिळावी म्हणून आराखडे आणि कागदपत्रांवर तशी नोंद करवून देण्याचा विश्वासही त्यांनी सहकारी मनोरंजन मंडळाला दिला. नाट्यकर्मीच्या भावनांचा आदर करून योग्य ती कार्यवाही सुरू केल्याबद्दल नाट्यकर्मीनी मा. केसरकरांचे आभार व्यक्त केले.


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: