Thursday, April 25, 2024
HomeMarathi News Todayविद्यार्थ्यांमध्ये केवळ उपजीविकेकरिता ज्ञान नव्हे तर समाजसमर्पित ध्यान हवे, अवधान हवे..!

विद्यार्थ्यांमध्ये केवळ उपजीविकेकरिता ज्ञान नव्हे तर समाजसमर्पित ध्यान हवे, अवधान हवे..!

Share

मुंबई – गणेश तळेकर

भावी बिसनेस लीडर्स घडवताना आजूबाजूला असणाऱ्या सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि समाजभान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे या उद्देशाने जयश्री शरदचंद्र कोठारी बिझनेस स्कूल या मुंबईतील मॅनेजमेंट स्कूल ने मंथन या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याचा समारोप दि २ मार्च २०२४ रोजी किर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात झाला.

लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा भाग असणाऱ्या जे एस के बिसनेस स्कुल ने व्यवस्थापन कौशल्यासोबत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबविला होता. या अंतर्गत जनकल्याण समितीच्या मार्फत विविध सेवा वस्त्यांमध्ये चालणाऱ्या ‘माता-बाल आरोग्य सेवा’ या सेवाकार्यास विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या.

तिथे काम करणाऱ्या सेवाव्रतींशी तसेच स्थानिक लाभार्थ्यांची संवाद साधला. जनकल्याण समितीच्या माध्यमातून चालणाऱ्या या उपक्रमाचे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमितीय संशोधन आराखड्याच्या साहायाने विश्लेषण केले. यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष त्या वस्त्यांवर जाऊन संवाद साधला. आपली निरीक्षणे नोंदविली. प्रत्यक्ष पाहणी, मुलाखत, निरीक्षणे, या सर्वांचा साकल्याने अभ्यास करून याचा एक सविस्तर विवेचनात्मक अहवाल तयार केला आहे. ”

आपल्या आजूबाजूला असंही एक जग आहे याची आम्हाला कल्पनाच नव्हती, कुरबुर करण्यासारख्या अनेक गोष्टी असतानाही जे आहे त्यात प्रचंड आनंदी राहणाऱ्या आणि प्रेमाने प्रत्येकाचे आदरतिथ्य करणाऱ्या ताई अन दादानी आम्हाला नकळत जगण्याचा नवा दृष्टिकोन शिकविला”, हि विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे.

“उद्याच्या बलशाली भारताचे भविष्य असणाऱ्या या युवा वर्गाचा सामाजिक उपक्रमातील सहभागाचा हा समारोप नव्हे तर सुरवात ठरावी”, असा विश्वास नाना पालकर स्मृती समितीचे श्री शरदजी खाडिलकर यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला. डे. ए. सोसायटीचे ट्रस्टी श्री. निल हेलेकर यांचा प्रोत्साहनाने सुरु झालेल्या या उपक्रमाची जे. एस. के. बिसनेस स्कुलच्या संचालिका डॉ. गिरीबाला देवस्थळे यांनी शिक्षकांच्या मदतीने संपूर्ण आखणी केली होती.

या प्रसंगी जनकल्याण समितीचे श्री. संदीप वेलिंग, डॉ. अजित मराठे, श्री. सहदेव सोनावणे, श्री. संजय माळकर तसेच डे. ए. सोसायटीच्या कौन्सिल मेंबर श्रीम. उषा मराठे, कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. पवार, उप-प्राचार्या डॉ. मीनल मापुसकर, आदी मान्यवर उपस्थित होते.


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: